Pune News | ओतूरमध्ये चौथा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न | ८३ कवींनी सादर केल्या रचना
| पाच पुस्तकांचे प्रकाशन, पैठणच्या अंकित आव्हाड यांना प्रथम पारितोषिक
Otur News – (The Karbhari News Service) – रविवार २४ ऑगस्ट रोजी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे चौथा राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे खजिनदार रणजित पवार यांनी प्रास्ताविक केले तर स्वागताध्यक्ष डॉ. खं. र. माळवे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
पाच पुस्तकांचे प्रकाशन:
या महोत्सवात ५ पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
१. राजेश साबळे ओतूरकर लिखित लेखसंग्रह ‘मला काही सांगायचंय’
२. डॉ. प्रवीण डुंबरे यांचा बालकवितासंग्रह ‘आई, दे ना खाऊ!’
३. डॉ. खं. र. माळवे यांचा ‘सामाजिक पर्यावरण’ लेखसंग्रह
४. शोभा गवांदे-कानवडे यांचा ‘भागीरथाची गंगा’
५. श्रावणधारा काव्यमहोत्सव समितीचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह भाग-३
जिल्हा परिषद सदस्या डॉ. छायाताई तांबे या उद्घाटक तर शोभाताई गवांदे-कानवडे या अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट, मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे, माजी जि.प. सदस्य मोहितशेठ ढमाले, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ज्येष्ठांचा सन्मान:
पाठ्यपुस्तकातील कवी इंजि. शिवाजीराव चाळक आणि उत्तम सदाकाळ या ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आनंदा वळे, डॉ. ऋत्विक कोंडार आणि डॉ. पुष्पांजली वळे यांचाही गौरव करण्यात आला.
काव्यस्पर्धा निकाल:
या महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून ८३ कवींनी सहभाग घेतला. मसाप राजगुरूनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे आणि प्रसिद्ध निवेदक संदीप वाघोले आळेफाटा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
*प्रथम – अंकित आव्हाड (पैठण)*
*द्वितीय – शशिकला कुंभार (ठाणे)*
*तृतीय – अविनाश बाळासाहेब हांडे (उंब्रज, जुन्नर)*
*चतुर्थ – आनंदा त्रिभुवन (ब्राम्हणवाडा, अकोले)*
*पाचवा – सौ. सविता जंगम (ओतूर)*
या महोत्सवासाठी उपाध्यक्ष डॉ. खं. र. माळवे, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश गे. डुंबरे, सचिव डॉ. प्रवीण डुंबरे, सहसचिव संजय गवांदे, खजिनदार रणजित पवार, सहखजिनदार प्रा. नागेश हूलवळे यांनी परिश्रम घेतले. कविवर्य संजय गवांदे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष राजेश साबळे ओतूरकर यांनी आभार मानले.
यावेळी पोपटराव नलावडे, प्रा. डॉ. नामदेव डोके, अँड. भास्कर देशपांडे, इंजि. प्रकाश देशमुख, सुरेखा भोर, शैला साबळे, नंदा गवांदे, प्रतिभा डुंबरे, मीनाक्षी देशमुख आदी नामांकित साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—

COMMENTS