Pune PMC News | अखेर भूमी ग्रीनच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी | प्रशासन आणि सभागृह नेते म्हणाले, हा आजपर्यंतचा सर्वात कमी दर!

Homeadministrative

Pune PMC News | अखेर भूमी ग्रीनच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी | प्रशासन आणि सभागृह नेते म्हणाले, हा आजपर्यंतचा सर्वात कमी दर!

Ganesh Kumar Mule Aug 25, 2026 4:49 PM

PMC Standing Committee | सुक्या कचऱ्याच्या वाहतूक व प्रक्रियेसाठी ६.८३ कोटींच्या ठेक्याचा प्रस्तावाला मान्यता | प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने केला विरोध 
Bhumi Green Energy | देवाची उरुळी येथे ५०० टन कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेचा ५७८ कोटींचा ठेका | भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड
PMC : Garbage Project : देवाची उरुळी येथील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढणार

Pune PMC News | अखेर भूमी ग्रीनच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी | प्रशासन आणि सभागृह नेते म्हणाले, हा आजपर्यंतचा सर्वात कमी दर!

 

PMC GB Meeting – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका हद्दीत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तब्बल ५७७ कोटी ९६ लाख रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला होता. देवाची उरुळी कचरा डेपो येथे दररोज ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकात्मिक ओला-सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सर्वांत कमी दर देणाऱ्या भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड करण्यात आली आहे. मात्र याला विरोधी पक्षांनी जोरदार हरकत घेतली. मात्र सत्ताधाऱ्यांनी आपले बहुमत सिध्द करत हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. (PMC General Body Meeting)

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत आज भूमी ग्रीनच्या प्रस्तावावरून जोरदार वाद झाला. विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला, मात्र सत्ताधाऱ्यांच्या बहुमताने अखेर भूमी ग्रीनच्या प्रस्तावाला मुख्य सभेत मान्यता देण्यात आली.

यावेळी सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या प्रस्तावाची बाजू मांडली.

बिडकर म्हणाले, “पुण्याची वाढती लोकसंख्या आणि फ्लो बघता शहरात जवळपास १० लाख फ्लोटिंग लोकसंख्या आहे. वाढत्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे ही काळाची गरज आहे.  या आधीचे अनेक प्रकल्प यशस्वी झाले नाहीत. मात्र भूमी ग्रीन कंपनी गेले १० वर्ष चांगले काम करत असल्याचे दिसून येते आहे.

“सत्यता तपासून पाहता भूमी ग्रीनचा रेट हा सर्वात योग्य आहे. आम्ही ५:२:२ चा जुना प्रस्ताव रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवली आहे,” असे बिडकर यांनी स्पष्ट केले.

हा प्रकल्प पावसाळ्यापूर्वी करणे अत्यंत गरजेचे आहे. ९० दिवसांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असून, मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक तरतूदही करण्यात आली आहे.

“आतापर्यंतचा सर्वात कमी दर असलेला हा कचऱ्याचा प्रकल्प आहे. कोण ठेकेदार आहे किंवा काय, हे बघण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव आणला आहे, स्थायी समितीने त्याला मान्यता दिली आहे.

या विषयावर काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे, गटनेते चंदू कदम, विरोधी पक्षनेते निलेश निकम, गटनेते काका चव्हाण, नितीन गावडे, सुनील शिंदे, यासह विरोधी नगरसेवकानी जोरदार आक्षेप घेत आपला विरोध नोंदवला.

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी भूमी ग्रिन कंपनी ला काम देण्यामागे काय भूमिका आहे, ते स्पष्ट केले. तसेच महापालिकेने आर्थिक हित देखील पाहिले असल्याचे नायर यांनी सांगितले.

*विरोधकांच्या उपसूचना फेटाळल्या*

विरोधी पक्षांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत उपसूचना मांडल्या होत्या. मात्र, त्या उपसूचना सभागृह नेते यांनी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे त्यावर त्यावर मतदान घेण्यात आले. तसेच मूळ प्रस्तावावर देखील मतदान घेण्यात आले. मात्र सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असल्याने प्रस्तावाच्या बाजूने १०९ तर विरोधात ३८ असे मतदान झाले. त्यानुसार हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: