Pune PMC News  | महापालिका संसर्गजन्य आजारांवर ठेवणार देखरेख | साथरोग नियंत्रणाची  महापालिकेची क्षमता वाढणार 

Homeadministrative

Pune PMC News  | महापालिका संसर्गजन्य आजारांवर ठेवणार देखरेख | साथरोग नियंत्रणाची  महापालिकेची क्षमता वाढणार 

Ganesh Kumar Mule Aug 14, 2026 7:01 PM

Suhas Tingre NCP | पूरनियंत्रण कामांत दोन वर्षांचा विलंब | महापालिका प्रशासन ठेकेदाराच्या खिशात आहे का? – सुहास टिंगरे
 4 Special Scod Vehicles in fleet of PMC Solid Waste Management Department
Pune Municipal Corporation Schools | विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी पुणे महापालिकेच्या 10 शाळांचे होणार विलीनीकरण! | मराठी, ऊर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश! 

Pune PMC News  | महापालिका संसर्गजन्य आजारांवर ठेवणार देखरेख | साथरोग नियंत्रणाची  महापालिकेची क्षमता वाढणार

कसबा पेठेत बीएसएल-२ प्रयोगशाळेसह मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट

१३ कोटींच्या स्थापत्य कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती; स्थायी समितीची मंजुरी

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  कसबा पेठेतील सीटीएस क्रमांक ९३० येथे अत्याधुनिक बीएसएल-२ प्रयोगशाळेसह मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट उभारण्यात येणार आहे. या युनिटच्या स्थापत्यविषयक कामासाठी १३ कोटी ५ लाख ६४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हे काम मे. कॉन्सेप्ट क्रिएटर या ठेकेदारामार्फत करून घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (PMC Standing Committee)

महापालिकेच्या भवन विभागामार्फत या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पूर्वगणनपत्रकाची रक्कम १५ कोटी ६९ लाख ९६ हजार ६६८ रुपये होती. त्यापैकी १३ कोटी २८ लाख ६२ हजार २१९ रुपयांच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली होती. या प्रक्रियेत तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन पात्र, तर एक निविदा अपात्र ठरली.

मे. कॉन्सेप्ट क्रिएटर यांनी ११ कोटी ४ लाख ६१ हजार १६२ रुपये ४८ पैसे इतकी निविदा सादर केली आहे. हा दर निविदा रकमेपेक्षा १६.८६ टक्के कमी आहे. दुसऱ्या पात्र ठेकेदाराने १२.३० टक्के कमी दर दिला आहे. त्यामुळे सर्वांत कमी दराच्या कॉन्सेप्ट क्रिएटर यांच्या निविदेची शिफारस करण्यात आली आहे.

ठेकेदाराच्या निविदा रकमेवर १ कोटी ९८ लाख ८३ हजार ९ रुपये जीएसटी आणि २१ हजार ९३० रुपये मटेरियल टेस्टिंग शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण खर्च १३ कोटी ५ लाख ६४ हजार रुपये इतका होणार आहे. याशिवाय विशेष आणि सर्वसाधारण भाववाढीच्या सूत्रानुसार होणारा फरक अदा किंवा कपात केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रामार्फत निधी उपलब्ध असून, सन २०२६-२७ मध्ये २७ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद आहे. मात्र, संबंधित कामासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. उपलब्ध निधीच्या मर्यादेत काम करून घेण्याची जबाबदारी भवन विभागावर राहणार आहे.

बीएसएल-२ प्रयोगशाळा आणि सर्व्हिलन्स युनिटमुळे संसर्गजन्य आजारांवर देखरेख, नमुना तपासणी आणि साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेची क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: