PMC Road Department | महापालिका आयुक्तांची शहरातील रस्ते आणि पुलांच्या कामांची पाहणी

Homeadministrative

PMC Road Department | महापालिका आयुक्तांची शहरातील रस्ते आणि पुलांच्या कामांची पाहणी

Ganesh Kumar Mule Aug 10, 2026 9:48 PM

Pune Metro News | जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ | स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन
PMC Retirement | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सेवानिवृत्त! | साहेबराव दांडगे, नितीन उदास यांच्यासहित १७६ कर्मचारी सेवानिवृत्त 
Cabinet Meeting Decision News | मंत्रिमंडळ बैठक : एकूण निर्णय- 5 | जाणून घ्या सविस्तर 

PMC Road Department | महापालिका आयुक्तांची शहरातील रस्ते आणि पुलांच्या कामांची पाहणी

15 ऑगस्टपर्यंत खराडी-केशवनगर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  शहरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज  10 ऑगस्ट रोजी शहरातील विविध महत्त्वाच्या रस्ते व पूल प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांमध्ये असलेले अडथळे तातडीने दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. (Naval Kishore Ram IAS)

या पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त विशेष ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, प्रभारी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

1. नॉर्थ मेन रोड – ABC फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक
या ठिकाणी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. कामातील अडथळे दूर करण्यासाठी सर्व संबंधित सेवावाहिन्यांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच उर्वरित भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून रस्ता रुंदीकरणाचे काम शीघ्रतेने पूर्ण करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

2. हडपसर रेल्वे स्टेशन रस्ता
हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर सुरू असलेल्या पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईनच्या कामांची पाहणी करण्यात आली. नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असलेला हा महत्त्वाचा रस्ता असल्याने कामे विनाअडथळा आणि जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि तज्ञ सल्लागारांना दिले.

3. खराडी–केशवनगर पूल
खराडी-केशवनगर येथील नवीन पुलाच्या कामाची पाहणी करून दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी मुख्य अभियंता पथ यांना दिल्या.

दरम्यान, पुलाच्या अप्रोच रोडची कामे सुरू राहणार असल्याने नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त नवल किशोर राम यांनी केले.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी तीन गोष्टींवर भर दिला – कामे वेळेत पूर्ण करणे, अडथळे तातडीने दूर करणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते आणि खड्ड्यांवरून टीका होत असताना आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरून पाहणी केल्याने आता कामांच्या गतीत बदल दिसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: