Shivsena Pune | पुणे महापालिकेच्या  कारभारा विरोधात शिवसेनेचा जनआक्रोश | शेकडो शिवसैनिकांनी महापालिका दणाणून सोडली 

HomeBreaking News

Shivsena Pune | पुणे महापालिकेच्या  कारभारा विरोधात शिवसेनेचा जनआक्रोश | शेकडो शिवसैनिकांनी महापालिका दणाणून सोडली 

Ganesh Kumar Mule Jul 30, 2026 8:25 PM

PMC Properties | मनपाच्या ताब्यातील ६१७८ पैकी ४१८८ मिळकतींच्या नोंदी अद्यापही खासगी मालकांच्या नावावर  | मेंटेनन्स सर्व्हेअरची २० पैकी १९ पदे रिक्त
Ajit Pawar |  जाती-धर्माचे राजकारण आणू नका | अजित पवार
Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान

Shivsena Pune | पुणे महापालिकेच्या  कारभाराविरोधात शिवसेनेचा जनआक्रोश | शेकडो शिवसैनिकांनी महापालिका दणाणून सोडली

 

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या  कारभाराविरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने आज महापालिका मुख्यालयावर आक्रमक जनआंदोलन करण्यात आले. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडत विविध घोषणांनी प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाद्वारे आयुक्तांना विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदनही सादर करण्यात आले. (Pune Breaking News)

आंदोलनात पहिल्याच पावसात उघडकीस आलेले निकृष्ट दर्जाचे रस्ते, आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या विकासकामांतील त्रुटी, घनकचरा व्यवस्थापनातील वाढलेला खर्च असूनही शहरातील अस्वच्छता, दूषित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, एलईडी दिव्यांची चोरी, शिक्षण विभागातील फाईल गायब होण्याची घटना, भर पावसात झाडांना टँकरने पाणी देणे, स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधा, भरती प्रक्रियेतील अनियमितता, पीएमपीएमएलमधील पदोन्नतीतील कथित गैरव्यवहार तसेच घनकचरा विभागातील १५० कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय यासह अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावेळी शिवसेनेने महापालिकेने जनआक्रोश मोर्चानंतर बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच पावसाळ्यापूर्वीच्या कामांची माहिती मागितल्यानंतर महापालिकेने “माहिती उपलब्ध नाही” असा लेखी खुलासा देत स्वतःच्या बेजबाबदार कारभाराची कबुली दिल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, सार्वजनिक निधीच्या वापराची चौकशी आणि प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर तसेच शेकडो पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आक्रमक घोषणाबाजी करत पुणेकरांच्या विविध नागरी समस्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान संपूर्ण महापालिका परिसर घोषणांनी दणाणून गेला असून, पुणेकरांच्या प्रश्नांवर निर्णायक लढा सुरूच राहील, असा निर्धार शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: