LGS – LSGD | अभ्यासक्रमाकडे वेतनवाढ म्हणून नाही तर कामकाजात प्रवीण होण्याकडे लक्ष द्या | एलजीएस, एलएसजीडी, डीएलजीएफएम अभ्यासक्रम उद्घाटनप्रसंगी फॅकल्टींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Homeadministrative

LGS – LSGD | अभ्यासक्रमाकडे वेतनवाढ म्हणून नाही तर कामकाजात प्रवीण होण्याकडे लक्ष द्या | एलजीएस, एलएसजीडी, डीएलजीएफएम अभ्यासक्रम उद्घाटनप्रसंगी फॅकल्टींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Ganesh Kumar Mule Jul 26, 2026 8:42 AM

Vilas Kanade | लघुलेखक ते अतिरिक्त महापालिका आयुक्त… एक स्वप्नवत प्रवास…! | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका
Nagar Road BRTS | पुणे महापालिकेकडून नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन वर्षांपासून मार्ग होता बंद
PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

LGS – LSGD | अभ्यासक्रमाकडे वेतनवाढ म्हणून नाही तर कामकाजात प्रवीण होण्याकडे लक्ष द्या

| एलजीएस, एलएसजीडी, डीएलजीएफएम अभ्यासक्रम उद्घाटनप्रसंगी फॅकल्टींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

LGS – LSGD – (The Karbhari News Service) –  आषाढी एकादशी निमित्त अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एलजीएस, एलएसजीडी आणि डीएलजीएफएम या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या 2026-27 या वर्षाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात फॅकल्टींनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला. अभ्यासक्रमाकडे केवळ वेतनवाढ मिळते म्हणून पाहू नका, तर त्यामुळे आपले महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज अधिक चांगले कसे होईल याकडे लक्ष द्या.

कार्यक्रमाला माजी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, माजी सल्लागार कामगार नंदकिशोर जगताप, माजी सल्लागार कामगार शिवाजीराव दौंडकर, राजेंद्र राऊत, आढागळे, विश्राम देव, ठोके, योगेश गडाळे, रासनकर, दिवाण यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आणि नवीन प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.

विलास कानडे, राजेंद्र राऊत, आढागळे, शिवाजीराव दौंडकर, नंदकिशोर जगताप, ठोके आणि विश्राम देव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एलजीएस, डीएलजीएफएम आणि एलएसजीडी हा अभ्यासक्रम केवळ आर्थिक लाभासाठी नाही. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कामकाजातील कायदा, नियम, प्रक्रिया आणि प्रशासन अधिक चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे आपण अधिक कार्यक्षम आणि प्रवीण अधिकारी, कर्मचारी म्हणून काम करू शकतो.

त्यांनी पुढे सांगितले की, अभ्यासक्रमाच्या यशासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली उपस्थिती, दुसरी शिस्त आणि तिसरी समर्पण. सर्वांनी वेळेवर वर्गाला उपस्थित राहिले पाहिजे. डेडिकेशन आणि डिसिप्लिन ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विषय स्वतः समजून घेतला पाहिजे. फक्त प्रमाणपत्रासाठी न शिकता ज्ञानासाठी शिका, असा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागीय संचालक यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे नितीन केंजळे यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मागील वर्षी एलजीएस, एलएसजीडी आणि डीएलजीएफएम मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद नामदे यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर मुरूकटे यांनी केले. कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: