Mohan Joshi Pune Congress | विद्यार्थ्यांविरोधात पोलीस बळाचा वापर नको | माजी आमदार मोहन जोशी यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

HomeBreaking News

Mohan Joshi Pune Congress | विद्यार्थ्यांविरोधात पोलीस बळाचा वापर नको | माजी आमदार मोहन जोशी यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Ganesh Kumar Mule Jul 24, 2026 7:23 PM

Wakeup Punekar Movement | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार | वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश
Pune Traffic | मुख्यमंत्रीसाहेब पुण्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मिळण्यासाठी मुहूर्त कधी लागणार? – माजी आमदार मोहन जोशी
Sonia Gandhi Birthday | सोनीया गांधी वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर २०२४ सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक

Mohan Joshi Pune Congress | विद्यार्थ्यांविरोधात पोलीस बळाचा वापर नको | माजी आमदार मोहन जोशी यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

 

Pune News – (The Karbhari News Service) – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हाव्या अशा मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींविरोधात पोलीस बळाचा वापर करून त्यांना मानहानीकारक वागणूक दिली जावू नये, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शुक्रवारी) पोलीस आयुक्तांना दिले.

पुण्यात आज विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता. त्या मार्चात मोहन जोशी सहभागी झाले. मोर्चाच्या सुरुवातीलाच मोहन जोशी यांनी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प आणि पोलीस आयुक्तांना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवेदनाची प्रत दिली. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत सुरसे, इंटकचे शहराध्यक्ष चेतन अगरवाल, प्रदेश सरचिटणीस सुरेश कांबळे, तसेच राजेंद्र शिंदे, नागेश खडके, महेश पवार, विकास सुपनार, अनिल कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईतील दादर येथे एका आंदोलनकर्त्या युवतीचा विनयभंग करण्यात आला आणि मानहानी करणारी वागणूक तिला पोलीसांकडून मिळाली, या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पहाताना संताप होत असून आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या पालकांच्या मनात काळजी निर्माण झाली आहे. याची आपण दखल घ्यावी, असेही पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0