Pune Water Supply | पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत | सध्या कोणतीही पाणीकपात नाही – महापौर मंजुषा नागपुरे
Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील नागरिकांना दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून, सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली. (Mayor Manjusha Nagpure)
शहरातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा नियमित आढावा महानगरपालिकेकडून घेतला जात आहे. नागरिकांना नियमित वेळेनुसार पुरेसा पाणीपुरवठा होत असून, पाणीकपातीबाबत प्रसारित होणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू असून, कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करण्याचे आवाहनही महापौरांनी केले.
महानगरपालिका नागरिकांना अखंड पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असून, सध्या पुणे शहरात कोणतीही पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS