PMC Employees Union | महापौर बंगल्यावर PMC एम्प्लॉईज युनियनची बैठक | नियमित बदल्या, पदोन्नतीची अट शिथिल करणे, रिक्त पदे भरणे  विषयांवर चर्चा

Homeadministrative

PMC Employees Union | महापौर बंगल्यावर PMC एम्प्लॉईज युनियनची बैठक | नियमित बदल्या, पदोन्नतीची अट शिथिल करणे, रिक्त पदे भरणे  विषयांवर चर्चा

Ganesh Kumar Mule Jul 17, 2026 8:55 PM

Pune Education News | गाडकवाडी गाव “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून झाले चकाचक! | गावच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन केला शिबिरार्थींचा यथोचित सन्मान!”
Gandhi Vichar | ‘गांधी विचार साहित्य संमेलना’चे ७, ८ व ९ मार्च रोजी पुण्यात आयोजन
PMC election 2022 | सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव  | सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त | प्रारूप मतदारयाद्या जाहीर 

PMC Employees Union | महापौर बंगल्यावर PMC एम्प्लॉईज युनियनची बैठक | नियमित बदल्या, पदोन्नतीची अट शिथिल करणे, रिक्त पदे भरणे  विषयांवर चर्चा

| सेवकांच्या 11 मागण्यांवर तातडीने कार्यवाहीचे महापौरांचे आदेश

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी व सेवकांच्या प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या मागण्यांसंदर्भात आज पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियनच्या शिष्टमंडळाने महापौर मंजुषा नागपुरे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत अत्यंत सकारात्मक वातावरणात चर्चा होऊन महापौरांनी सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी दिली. (Pune Municipal Corportion – PMC)

महापौर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत युनियनच्या वतीने निवेदन सादर करून कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. महापौरांनी सर्व मुद्दे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले आणि संबंधित खातेप्रमुख व युनियनच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले.

बैठकीत प्रामुख्याने खालील 11 मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली:

1. सलग तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी व सेवकांच्या नियमित बदल्या करणे.
2. प्रत्येक पदोन्नतीसाठी असलेली 3 वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करणे.
3. कनिष्ठ अभियंता, सुरक्षा अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी आणि उप नगरसचिव यांसारखी रिक्त पदे तातडीने भरणे.
4. मुख्य भवन येथील सेवकांच्या दुचाकी वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडवणे.
5. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी “महापालिका सेवक सुरक्षा आणि कायदेशीर सहाय्य समिती” स्थापन करणे.
6. मेट्रो प्रवासात सेवकांना सवलतीत पास देणे.

इतर मागण्यांमध्ये देखील सेवकांच्या सेवाशर्ती, वेतन, भत्ते आणि कामाच्या ठिकाणच्या सुविधा यांचा समावेश होता.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक दृष्टीने विचार केला. त्यांनी प्रशासनाला संबंधित खातेप्रमुखांसोबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावून सर्व विषयांवर तातडीने सकारात्मक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

महापौरांच्या या भूमिकेमुळे मनपा सेवकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशेने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या बैठकीला कामगारांचे बुलंद आवाज संघटनेचे अध्यक्ष बजरंग पोखरकर, उपाध्यक्ष विशाल ठोंबरे, कार्याध्यक्ष पूजा देशमुख, महिला अध्यक्षा छाया सूर्यवंशी, अजित गारळे, सहखजिनदार दीपक घोडके, विठ्ठल जायभाय, गणेश अडगळे, रोहन तांबट यांच्यासह युनियनचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: