Pune PMC News | पुणे महापालिकेत वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी 75 अर्ज! | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी सर्वाधिक 48 अर्ज 

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेत वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी 75 अर्ज! | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी सर्वाधिक 48 अर्ज 

Ganesh Kumar Mule Jul 17, 2026 7:17 AM

Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 
PMC Employees Promotion | वर्षभरात महापालिकेच्या ६०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती | आयुक्तांच्या हस्ते दिल्या ऑर्डर, आज्ञापत्र 
Safai Karmchari | सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

Pune PMC News | पुणे महापालिकेत वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीसाठी 75 अर्ज! | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी सर्वाधिक 48 अर्ज

| आता निवड समितीकडून अंतिम यादी

 

PMC GAD – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत सेवानिवृत्त, दिवंगत किंवा वैद्यकीय कारणाने सेवेतून कमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना लाड/पागे समितीच्या शिफारशीनुसार  शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. यासाठी एकूण 75 अर्ज प्राप्त झाले असून आता निवड समिती यातील पात्र उमेदवारांची अंतिम यादी तयार करणार आहे. (Lad Page Committee)

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने उप आयुक्त किशोरी शिंदे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे पत्र जारी केले आहे.

कोणत्या पदांसाठी किती अर्ज
प्राप्त झालेल्या 75 अर्जांमध्ये पदनिहाय विभागणी अशी आहे:

– कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 48 अर्ज
– कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 12 अर्ज
– कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 4 अर्ज
– संगणक प्रोग्रामर/ऑपरेटर – 9 अर्ज
– आरेखक – 1 अर्ज
– आरेखक (वास्तुशिल्प) – 1 अर्ज

पुणे महापालिकेतील सफाई कामगारांसह इतर विभागातील सेवकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या सुधारित तरतुदींनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे.

शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या वारसांना गट-क व गट-ड म्हणजेच वर्ग-3 व वर्ग-4 च्या पदांवर नियुक्ती देताना शैक्षणिक अर्हता वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे.

इतर विभागातील सेवकांच्या पात्र वारसांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ अभियंता, संगणक ऑपरेटर/प्रोग्रामर आणि आरेखक या पदांसाठी अर्ज सादर केले होते. त्यानुसार कार्यालयीन परिपत्रकाद्वारे प्रथम प्रसिद्ध यादी जाहीर करून नंतर फेरप्रसिद्ध यादीद्वारे अर्ज मागवण्यात आले होते.

आता प्राप्त 75 अर्जांची निवड समितीकडून पात्रता तपासणी केली जाणार आहे. पात्र ठरलेल्या वारसांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: