Shrinath Bhimale PMC | पाऊस थांबताच खड्डे युद्धपातळीवर बुजवा | पीएमसी रोड मित्र अँप वर खड्ड्याची तक्रार करा |  72 तासात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू  

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | पाऊस थांबताच खड्डे युद्धपातळीवर बुजवा | पीएमसी रोड मित्र अँप वर खड्ड्याची तक्रार करा | 72 तासात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू  

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 7:41 PM

Ajit Pawar | माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे | खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात | विरोधी पक्षनेते अजित पवार
sachin Sawant | पुलवामाचे सत्य काय आहे ? सचिन सावंत यांचा सवाल 
Old pension | आत्ता सेवानिवृत्त नंतर मिळेल जुन्या पेन्शन प्रमाणे ग्रॅज्युएटी | आत्ता संघर्ष हा सेवानिवृत्त नंतर मिळणाऱ्या पेन्शन साठी

Shrinath Bhimale PMC | पाऊस थांबताच खड्डे युद्धपातळीवर बुजवा | पीएमसी रोड मित्र अँप वर खड्ड्याची तक्रार करा | 72 तासात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू

| आवश्यकतेनुसार पुनर्डांबरीकरणाचा ॲक्शन प्लॅन तयार करा | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील डांबर वाहून जाऊन मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका प्रशासनाला तातडीने युद्धपातळीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. (Pune PMC News)

“पीएमसी रोड मित्र अँप वर नागरिकांनी खड्ड्याची तक्रार करावी, पाऊस थांबल्यानंतर 72 तासात कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा असा आदेशा भिमाले यांनी दिला. ते म्हणाले, पाऊस थांबताच शहरातील सर्व धोकादायक खड्डे 72 तासांच्या आत तात्पुरत्या स्वरूपात बुजवावेत. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरून वाहतूक सुरळीत करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.”

याचबरोबर, पावसाळा संपल्यानंतर शहरातील सर्व खराब रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करण्यासाठी विभागनिहाय आणि कालबद्ध कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून तो जाहीर करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

डांबराचा पुरेसा साठा, पर्यायी साहित्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आपत्कालीन यंत्रणा कायम सज्ज ठेवण्याचेही निर्देश श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: