Khadakwasla Jalpoojan | खडकवासला जलाशय येथे पुणे महानगरपालिकेतर्फे जलपूजन | नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी चांगल्या पर्जन्याची प्रार्थना
Pune Rain – (The Karbhari News Service) – सालाबादप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे आज खडकवासला जलाशय येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा व्हावा, तसेच नागरिकांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विधिवत जलपूजन करण्यात आले. (Mayor Manjusha Nagpure)
यावेळी आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सभासद सचिन मोरे, सोपान ऊर्फ काका चव्हाण, जयश्री भूमकर, राजाभाऊ लायगुडे, कोमल नवले, प्रसन्न दादा जगताप, अनिता ताई इंगळे, सुभाष नानेकर, धनश्री कोल्हे, भारत भूषण बराटे तसेच महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणेकर नागरिकांना वर्षभर सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगत, यंदाचा मान्सून समाधानकारक ठरून धरणक्षेत्रात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.

COMMENTS