Mayor Manjusha Nagpure | विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जोड देणे आवश्यक – महापौर मंजुषा नागपुरे

Homeadministrative

Mayor Manjusha Nagpure | विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जोड देणे आवश्यक – महापौर मंजुषा नागपुरे

Ganesh Kumar Mule Jul 04, 2026 2:25 PM

Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन
PMC Sanitory Inspector | सुरक्षा रखवालदार, बिगारी, गवंडी यांना आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती! 
R. K. Laxman Museum | आर. के. लक्ष्मण यांच्या समृद्ध कलेचा  ठेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा | चंद्रकांत पाटील 

Mayor Manjusha Nagpure | विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जोड देणे आवश्यक – महापौर मंजुषा नागपुरे

‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ अभियानांतर्गत आयोजित ‘कलावारी’ चित्रकला स्पर्धेत ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

Pune News – (The Karbhari News Service) – “विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जोड देणारे उपक्रम ही काळाची गरज आहे. ‘कलावारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, स्वच्छतेची जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान निर्माण होत आहे. अशा उपक्रमांमधून संवेदनशील, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्यास निश्चितच हातभार लागेल,” असे महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ अभियानांतर्गत ‘कलावारी’ चित्रकला स्पर्धा राबविण्यात येत आहे. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महापौर नागपुरे बोलत होत्या.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेत राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘कलावारी’ चित्रकला स्पर्धेला शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पुणे शहरातील ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत महाराष्ट्राची संतपरंपरा, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे प्रभावी चित्रण केले.

स्पर्धेच्या निमित्ताने महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विठ्ठल-रखुमाई, पालखी सोहळा, दिंडी, संतपरंपरा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच ‘सेवावारी’चा संदेश अत्यंत प्रभावीपणे चित्रांमधून साकारला. प्रत्येक चित्रातून भक्ती, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता प्रकर्षाने दिसून आली.

या स्पर्धेविषयी बोलताना आयुक्त डॉ. नवल किशोर राम म्हणाले की, पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ अभियानातील ‘कलावारी’ हा उपक्रम केवळ चित्रकला स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक उत्तरदायित्व आणि सांस्कृतिक जाणीव रुजविण्याचा प्रभावी प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळण्याबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सेवाभावाची मूल्ये समाजात अधिक दृढ करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने कार्यरत आहे.

‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कलात्मक अभिव्यक्ती मांडण्याची संधी मिळाली, तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्यही साध्य झाले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक विषयांप्रती असलेली आपली जागरूकता आणि कलात्मक दृष्टीकोन प्रभावीपणे व्यक्त केला.

स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींच्या आधारे प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव शालेय स्तरावर करण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागाची नोंद म्हणून डिजिटल सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी आपण काढलेले चित्र हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी क़्युआर कोड स्कॅन करा व आपण काढलेले चित्र अपलोड करून डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मिळावा. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या सहभागाची अधिकृत नोंद महानगरपालिकेने केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: