PMC Standing Committee | वृक्षारोपण व संवर्धनासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र यंत्रणा | १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी दीड कोटींचा निधी

Homeadministrative

PMC Standing Committee | वृक्षारोपण व संवर्धनासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र यंत्रणा | १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी दीड कोटींचा निधी

Ganesh Kumar Mule Jul 03, 2026 8:00 AM

Biometric Machine | PMC Pune | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना लावाव्या लागताहेत रांगा |मशीन अचानक बंद पडत असल्याने कर्मचारी त्रस्त
Lumbini Park | लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक
E-Identity | कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल मिळणार नाही | मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे आदेश

PMC Standing Committee | वृक्षारोपण व संवर्धनासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र यंत्रणा | १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी दीड कोटींचा निधी

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – पुणे शहरात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune Tree Plantation)

भिमाले म्हणाले, “बैठकीत वृक्षारोपणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या नियमित बैठका आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत राहणार आहे. या पथकामार्फत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, धोकादायक वृक्षांची छाटणी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी या कामांसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भिमाले म्हणाले, “वनमहोत्सव २०२६ अंतर्गत पुणे वनक्षेत्रात ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनेही शहरासाठी स्वतंत्र आणि परिणामकारक वृक्षारोपण आराखडा तयार करावा, यासाठी प्रशासनाला विविध निर्देश दिले.

भिमाले पुढे म्हणाले, “संयुक्त वन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वन विभाग यांच्यात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापनासाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्या माध्यमातून शहरात वनीकरणाचे विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: