PMC GB | कोरमअभावी पुणे मनपा मुख्य सभा करावी लागली तहकूब!

Homeadministrative

PMC GB | कोरमअभावी पुणे मनपा मुख्य सभा करावी लागली तहकूब!

Ganesh Kumar Mule Jun 30, 2026 12:50 PM

PMC General Body Meeting | कालच्या मुख्य सभेत ९५ प्रस्ताव मंजूर!
PMC HOD Present for GB | मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेस खातेप्रमुख यांची अनुपस्थिती | महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी 
Pune PMC News | पुतळा उभारण्यासाठी पारीत केलेले ठराव, ना-हरकत प्रमाणपत्रे वर्षानुवर्षे राहताहेत पडून | पुन्हा नव्याने घ्यावी लागते परवानगी 

PMC GB | कोरमअभावी पुणे मनपा मुख्य सभा करावी लागली तहकूब!

| ११९ नगरसेवक असूनही भाजपला सभासद जमवता आले नाहीत

| ‘राम मंदिर पेटी चोरी’वरून काँग्रेसची तहकुबी फेटाळली

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपला मोठे अपयश आल्याचे दिसून आले. ११९ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही भाजपला कोरमसाठी आवश्यक ५८ सदस्य सभागृहात उपस्थित ठेवता आले नाहीत. त्यामुळे महापौरांना सभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावी लागली. दुसरीकडे ‘राम मंदिर दानपेटी चोरी’ प्रकरणावरून काँग्रेसने मांडलेली कामकाज तहकुबीची सूचना ३१ विरुद्ध ४ मतांनी फेटाळण्यात आली. (Pune News)

सभागृहात नेमके काय घडले?

आजच्या सभेला सुरुवातीला जास्त सदस्य कांग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी चे होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी ११ वाजून १० मिनीटांनी मागणी केली की महापौर नाहीत तर उपमहापौर यांना सभापती करून सभेचे कामकाज चालवा. मात्र त्यानंतर महापौर सभागृहात आले. मात्र तेव्हा सभागृहात केवळ ३७ सभासद उपस्थित होते. नियमानुसार कोरमसाठी ५८ सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. विरोधकाकडून कोरम ची विचारणा झाल्याने नगरसचिव यांनी संख्याबळ मोजले. संख्या कमी होती त्यामुळे कांग्रेस ने सभा तहकुबी मांडली. काँग्रेसने ‘राम मंदिरातील दानपेटी चोरी’ या विषयावर तातडीने चर्चा व्हावी, यासाठी कामकाज तहकुबीची सूचना मांडली. सभागृह नेत्यांनी ही सूचना स्वीकारली नाही.

त्यानंतर तहकुबी सूचनेवर मतदान घेण्यात आले. दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय खेळी करत आपले बहुतांश सदस्य आधीच सभागृहाबाहेर पाठवले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी तहकुबीच्या बाजूने केवळ ४ मते पडली, तर विरोधात ३१ मते पडली आणि सूचना फेटाळली गेली.

कोरमअभावी सभा तहकूब, भाजपची नाचक्की

सभागृहात कोरम नसल्याचे स्पष्ट झाले. ११९ नगरसेवकांचे बहुमत असलेल्या भाजपला साधे ५८ सदस्यही हजर ठेवता आले नाहीत. त्यामुळे महापौरांना नाईलाजाने सभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावी लागली. सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकूब करण्याची वेळ येणे, हे भाजपचे मोठे अपयश मानले जात आहे.

अनुपस्थित नगरसेवकांना भाजपचा दणका

सभेला गैरहजर राहिलेल्या स्वतःच्याच नगरसेवकांवर भाजप गटनेते संतापले. उपस्थित नसलेल्या सर्व भाजप सभासदांचे खुलासे मागवण्यात आल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले. महत्त्वाच्या सभेला दांडी मारल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

विरोधकांची राजकीय खेळी

काँग्रेसने तहकुबी सूचना मांडण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून आपले सदस्य जाणीवपूर्वक बाहेर पाठवले. त्यामुळे तहकुबी सूचना तर फेटाळली गेलीच, शिवाय कोरमअभावी सभा तहकूब झाल्याने सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी यशस्वी केल्याची चर्चा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: