Pune Water Cut | गुरुवारी  सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा परिसरासह ७० हून अधिक भागांचा पाणीपुरवठा बंद | शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी

Homeadministrative

Pune Water Cut | गुरुवारी  सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा परिसरासह ७० हून अधिक भागांचा पाणीपुरवठा बंद | शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी

Ganesh Kumar Mule Jun 29, 2026 7:31 PM

PMC Environment Department | पुणे महानगरपालिकेत हरित इंधनाच्या वापरासाठी बेकरी असोसिएशनची बैठक संपन्न | प्रणाली स्वीकारली नाही तर कारवाई करण्याचा इशारा 
PMC Website | वेबसाईट वर माहिती अद्ययावत करण्याबाबत महापालिकेच्या २७ विभागांची उदासीनता! | नगरसचिव, मुख्य लेखा, प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपुरवठा विभागांचा समावेश
MHADA Pune | महत्वाची बातमी | म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Pune Water Cut | गुरुवारी  सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा परिसरासह ७० हून अधिक भागांचा पाणीपुरवठा बंद | शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पर्वती HLR गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणाऱ्या १००० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अवंती सोसायटी, पद्मावती येथे गळती झाल्याने गुरुवारी  ०२ जुलै  रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पद्मावती पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा होणाऱ्या सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी व अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Water Supply Department)

मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. मात्र १ जुलै  रोजी नमूद भागास पाणीपुरवठा करण्यात येईल. मात्र, शुक्रवारी ३ जुलै रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने सर्व भागास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

–  सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकर नगर, डायस प्लॉट, डोलेमळा, सॅलसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, धनकवडी परिसर (पार्ट), गुलाबनगर, राऊत बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर, के.के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, तोडकर टाऊनशीप, स्टेट बँक नगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, वास्तुकल्प, गृहकल्प सोसायटी, दामोदर नगर, विद्यासागर सोसायटी, २७६ ओटा परिसर, वैभव सोसायटी, कॅनरा बँक परिसर, सुयोग-आदित्य परिसर, योगायोग सोसायटी, रम्यनगरी, जेधेनगर, जनसेवा सोसायटी, नवमित्र सोसायटी, भगले हॉस्पिटल परिसर, कोठारी ब्लॉक, वसंतबाग, अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम, गगनविहार, गगनगॅलक्सी, विद्यासागर सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, मार्केट यार्ड संपूर्ण परिसर इत्यादी भागांचा समावेश आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: