PMC Pulse Polio | राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पुण्यात २.७४ लाख बालकांना लस | पुणे मनपाची ८८.९५% उद्दिष्टपूर्ती | पुढील ५ दिवस घरोघरी लसीकरण

Homeadministrative

PMC Pulse Polio | राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पुण्यात २.७४ लाख बालकांना लस | पुणे मनपाची ८८.९५% उद्दिष्टपूर्ती | पुढील ५ दिवस घरोघरी लसीकरण

Ganesh Kumar Mule Jun 28, 2026 7:24 PM

PMC Chief Auditor Office | लेखापरीक्षण विभागाकडील ११ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखापरीक्षक पदावर दिली जाणार पदोन्नती | शिफारस केलेल्या कर्मचाऱ्यांची स्थायी समितीने पडताळणी न केल्याने होणार विवाद!
Rashtriya Chhatra Sena | दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु.पाणिनी सुनील तिबिले हिची निवड
Water Issue | बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता | अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

PMC Pulse Polio | राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पुण्यात २.७४ लाख बालकांना लस | पुणे मनपाची ८८.९५% उद्दिष्टपूर्ती | पुढील ५ दिवस घरोघरी लसीकरण

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार, २८ जून रोजी राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ० ते ५ वयोगटातील २ लाख ७४ हजार ५४९ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. ३,०८,६५६ बालकांच्या उद्दिष्टापैकी ८८.९४% लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरित बालकांसाठी पुढील ५ दिवस घरोघरी जाऊन लस देण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal corporation – PMC)

११८२ बूथ, ट्रान्झिट टीमची व्यवस्था

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे व ९५ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रांवर बूथ लावण्यात आले होते. तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे व अतिजोखमीच्या भागातही लसीकरण केंद्रे उभारली होती.
प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी बस स्थानके, एस.टी. स्थानके, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट व उद्यानांमध्ये ८४ ट्रान्झिट टीम व ४२ मोबाईल टीम नेमल्या होत्या. या टीम्सद्वारे २२,४२३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

महापौर, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

मोहिमेचे उद्घाटन क्षेत्रीय स्तरावर संबंधित प्रभागाच्या नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले. नारायण पेठ येथील मुख्य लसीकरण केंद्रात जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे यांनी बालकांना पोलिओ डोस पाजला. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका व आरोग्य सेवक उपस्थित होते.

प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कै. शांताबाई खडसरे दवाखान्यास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. नगर रोड व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील पल्स पोलिओ केंद्रावर अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, हडपसर येथे सहाय्यक संचालक डॉ. आमोद गढीकर यांनी तर धनकवडी येथे उप-संचालक डॉ. भगवान पवार यांनी सनियंत्रणासाठी भेट दिली व मार्गदर्शन केले.

राज्य शासनाकडून महापालिकेस ४ लाख २० हजार ७२० पोलिओ डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी २,८७,१८७ डोसेस वापरले गेले. यामध्ये ० ते ५ वयोगटातील २,७४,५४९ तर ५ वर्षांवरील ६,८०२ बालकांचा समावेश आहे. शासनाकडून २१,०३६ व्हायल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १७,४३४ पूर्ण व ८२४ अर्धवट व्हायल्स परत आल्या.

या मोहिमेसाठी निरामय स्वयंसेवी संस्था, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, रोटरी क्लब, लायन्स क्लब, IAP व IMA यांचे सहकार्य लाभले.

पुढील ५ दिवस विशेष मोहीम  

२८ जून रोजी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील ५ दिवस विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी १,६५५ टीम्स व ३२९ सुपरवायझर्स संपूर्ण शहरभर घरोघरी जाऊन लस देतील. तसेच महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्येही पुढील ५ दिवस पोलिओ डोस उपलब्ध राहतील.

“ही मोहीम यशस्वी करण्यासाठी घरोघरी पोलिओ डोस पाजण्यासाठी येणाऱ्या टीम्सना नागरिकांनी तसेच सोसायटीमधील चेअरमन व सेक्रेटरी यांनी सहकार्य करावे,” असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: