Pune Bhide Bridge | मेट्रो कामासाठी भिडे पूल १५ दिवस पूर्णपणे बंद!

Homeadministrative

Pune Bhide Bridge | मेट्रो कामासाठी भिडे पूल १५ दिवस पूर्णपणे बंद!

Ganesh Kumar Mule Jun 22, 2026 7:44 AM

Pune Metro Travel with Cycle | पुणे मेट्रोत सायकल घेऊन प्रवास करू शकता का? जाणून घ्या सविस्तर
Pune Metro | पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या उन्नत मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी
Shivajinagar ST Stand |काँग्रेसच्या आंदोलनाने शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम मार्गी | माजी आमदार मोहन जोशी

Pune Bhide Bridge | मेट्रो कामासाठी भिडे पूल १५ दिवस पूर्णपणे बंद!

| ७ जुलैपासून दिवसा पूल सुरू; मात्र रात्री ११ ते सकाळी ६ बंदी कायम

 

Pune Traffic Update – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोच्या कामासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाच्या परवानगीनुसार २१ जून २०२६ रोजी रात्री १ वाजेपासून म्हणजेच २२ जूनच्या पहाटे १ वाजल्यापासून ६ जुलै २०२६ पर्यंत हा पूल दिवस-रात्र दोन्ही वेळेस बंद राहणार आहे. (Pune Metro)

महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दिवसा वाहतूक सुरळीत सुरू राहील.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या अनुषंगाने भिडे पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्बंध लावण्यात आले आहेत. काम सुरू असताना नागरिकांची आणि वाहनचालकांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने ही वाहतूक बंदी मंजूर केली आहे.

महामेट्रोने नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मेट्रो कामासाठी हा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महामेट्रोने दिलगीरी व्यक्त केली असून, काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

२१ जून ते ६ जुलै २०२६: भिडे पूल २४ तास बंद.

७ जुलै २०२६ पासून: दररोज रात्री १ ते सकाळी ६ पर्यंत बंद.

दिवसा ७ जुलैपासून वाहतूक सुरू राहणार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: