International Yoga Day 2026 |  ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Homeadministrative

International Yoga Day 2026 |  ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Ganesh Kumar Mule Jun 22, 2026 8:05 AM

Pune Water Supply | पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत | सध्या कोणतीही पाणीकपात नाही – महापौर मंजुषा नागपुरे
Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार | महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिला विश्वास 
PMC Employees Union | महापौर बंगल्यावर PMC एम्प्लॉईज युनियनची बैठक | नियमित बदल्या, पदोन्नतीची अट शिथिल करणे, रिक्त पदे भरणे  विषयांवर चर्चा

International Yoga Day 2026 |  ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

Pune News – (The Karbhari News Service) – १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य योग कार्यक्रमास सुमारे ५ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. (Pune Breaking News)

मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला.

यावेळी कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, आमदार  हेमंत रासणे,  उपमहापौर  परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले, पुणे शहराध्यक्ष  धीरज घाटे,  अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी  ज्योती कदम,  महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव  संजय शेटे,  जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,  डबल महाराष्ट्र केसरी  शिवराज राक्षे,  शिवछत्रपती पुरस्कारार्थी  सोनाली गारगोटे तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध मा. उपायुक्त, मा. विभागप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मुख्य योग प्रशिक्षक मा. श्रीमती मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० योग प्रशिक्षकांनी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. उपस्थित नागरिकांनी योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

महापौर मंजुषा दीपक नागपुरे म्हणाल्या की, भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य वारसा असलेल्या योगाला आज संपूर्ण जगाने स्वीकारले असून, योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे. यंदाची “निरोगी वृद्धत्वासाठी योग” ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण असून, वाढत्या वयानुसार उत्तम आरोग्य, मानसिक शांतता, शारीरिक क्षमता आणि आत्मनिर्भर जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी योग प्रभावी माध्यम ठरते. निरोगी समाज, सुदृढ कुटुंब आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करावा व “करा योग – रहा निरोग” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून निरोगी भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: