Pavneet Kaur IAS | मान्सून कमकुवत | सामान्य पाऊस फक्त १४% | पुणे महापालिकेचा पाणी बचतीचा ‘अॅक्शन प्लॅन’!

Homeadministrative

Pavneet Kaur IAS | मान्सून कमकुवत | सामान्य पाऊस फक्त १४% | पुणे महापालिकेचा पाणी बचतीचा ‘अॅक्शन प्लॅन’!

Ganesh Kumar Mule Jun 20, 2026 10:13 PM

Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल 
EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक
Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक

Pavneet Kaur IAS | मान्सून कमकुवत | सामान्य पाऊस फक्त १४% | पुणे महापालिकेचा पाणी बचतीचा ‘अॅक्शन प्लॅन’!

| विभागवार जबाबदाऱ्या निश्चित | उल्लंघनास १० हजार दंड

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – भारतीय हवामान विभागाने जून ते सप्टेंबर २०२६ या मान्सून काळात पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा कमी वर्तवल्यानंतर पुणे महापालिकेने शहरात पाणी टंचाई टाळण्यासाठी विभागवार जबाबदाऱ्या निश्चित करून कडक अॅक्शन प्लॅन लागू केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी जारी केलेल्या आदेशात प्रत्येक विभागाला नेमून दिलेली कामे आणि दंडाची तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे. (PMC Water Supply Department)

IMD च्या मते, यंदा देशातील हंगामी पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या ९६% ते १०४% दरम्यान राहण्याची शक्यता फक्त २४% आहे. नियमित पाऊस फक्त १४% पडणार आहे. ९०% पेक्षा कमी पावसाची शक्यता ६०% असल्याने पुण्यात पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

विभागनिहाय जबाबदाऱ्या काय?

क्षेत्रीय कार्यालय – महापालिका सहायक आयुक्त, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकदम
कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि खासगी बोरिंग, वॉशिंग सेंटर तातडीने बंद करावेत आणि ते बंद राहतील याची खातरजमा करावी. उल्लंघन आढळल्यास १० हजार रुपये दंड आकारावा.
फिरत्या गाड्यांद्वारे नागरिकांना पाणी काटकसरीची माहिती देऊन जनजागृती करावी.
आवाहन, माईक, ध्वनी प्रसारणाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करावे.
वाहन धुणे, अंगण-पदपथ स्वच्छ करण्यासाठी महापालिकेचे पाणी वापरू नये, याची जनजागृती करावी.
खाजगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूल, खाजगी उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करावा. उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड.
खाजगी सोसायट्यांमधील एसटीपीचे पाणी बंधनकारकपणे वापरण्याबत मोकदम, आरोग्य निरीक्षक यांनी नोटीस द्यावी.

पाणीपुरवठा विभाग – संबंधित उप अभियंता व कनिष्ठ अभियंता

अनधिकृत नळजोड आढळल्यास तातडीने कनेक्शन तोडून कायदेशीर कारवाई करावी.
कोणत्याही भागात पाण्याची गळती आढळल्यास ती तातडीने दुरुस्त करावी.
टँकरमधून पाण्याची विक्री करताना गळती आढळल्यास टँकर मालकावर १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करावी.

भवन रचना विभाग – संबंधित उप अभियंता व कनिष्ठ अभियंता

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई आहे. त्यासाठी ईएसटीपीचे पाणी किंवा बीओआरटीएलचे पाणी वापरणे बंधनकारक आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करावी.

पथ विभाग – संबंधित उप अभियंता व कनिष्ठ अभियंता

रस्त्यांची स्वच्छता करताना पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई आहे.
ईएसटीपी किंवा बीओआरटीएलचे पाणी वापरणे बंधनकारक आहे. उल्लंघन केल्यास ठेकेदारावर १० हजार रुपये दंडाची कारवाई करावी.

उद्यान विभाग – हॉर्टिकल्चर मिस्त्री 

महापालिकेच्या उद्यानांसाठीही पिण्याचे पाणी वापर बंद करावा.
बांधकाम विभागाच्या धर्तीवर पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक आहे.

कडक कारवाईचा इशारा

कोणत्याही नागरिकाने किंवा संस्थेने वरील आदेशाचे दोन वेळा उल्लंघन केल्यास तिसऱ्या वेळी त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नोडल अधिकारी आणि अहवाल

प्रत्येक विभागात एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांनी दररोज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाणीपुरवठा विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. नोडल अधिकाऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांकही पाणीपुरवठा विभागाला कळवणे आवश्यक आहे.

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: