Suhas Tingre NCP | आळंदी रोडवरील कळस परिसरात संत ज्ञानेश्वर महाराजांची शिल्प असलेली स्वागत कमान उभारणार | स्थायी समितीची मान्यता

HomeBreaking News

Suhas Tingre NCP | आळंदी रोडवरील कळस परिसरात संत ज्ञानेश्वर महाराजांची शिल्प असलेली स्वागत कमान उभारणार | स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Jun 16, 2026 10:42 PM

Pune PMC News | निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ | प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
PMC Standing Committee | प्रभाग समित्यांना २५ लाखांपर्यंत निविदा मंजुरीचे अधिकार!
PMC Standing Committee | साखर संकुल ते जुना पुणे-मुंबई रस्ता येथे 75 कोटींचा उड्डाणपूल | महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर 

Suhas Tingre NCP | आळंदी रोडवरील कळस परिसरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भव्य स्वागत कमान उभारणार | स्थायी समितीची मान्यता

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  पुणे शहरात प्रवेश करताना आळंदी रोड मार्गावरील कळस परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे भव्य शिल्प असलेली स्वागत कमान उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. (Pune PMC News)

हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी मांडला होता.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. आळंदी रोड हा पुणे शहरात प्रवेश करण्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो नागरिक, वारकरी, भाविक, पर्यटक तसेच देश-विदेशातील पाहुणे या मार्गाचा वापर करतात. कळस परिसरात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीची सुरुवात होत असल्याने या ठिकाणी शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक म्हणून भव्य स्वागत कमान उभारणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील अजरामर संत, ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचे निर्माते व अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असले संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. आळंदी हे त्यांचे संजीवन समाधीस्थळ असल्यामुळे आळंदी मार्गावरील पुणे प्रवेशद्वारावर त्यांचे शिल्प असलेली कमान उभारणे हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत उचित व गौरवास्पद ठरेल, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आळंदी रोडवरील कळस परिसरात, पुणे शहराच्या हद्दीच्या प्रारंभस्थळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पासह भव्य स्वागत कमान उभारण्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: