Palakhi Sohala 2026 |पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका कडून पालखी मार्गावर 24 तास स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सुरक्षा यंत्रणा!

Homeadministrative

Palakhi Sohala 2026 |पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका कडून पालखी मार्गावर 24 तास स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सुरक्षा यंत्रणा!

Ganesh Kumar Mule Jun 15, 2026 8:30 PM

PMC on Stray Dogs | भटक्या श्वानांना ‘मायक्रोचिप’ बसवण्याचा पुणे महापालिकेचा  निर्णय!  |  असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली महापालिका! 
PMC GAD | महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रच सादर केले नाही | कारवाई करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा इशारा
PMC Employees on Indore Tour |  पुणे महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी निघाले इंदौरला!

Palakhi Sohala 2026 | पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका कडून पालखी मार्गावर 24 तास स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सुरक्षा यंत्रणा!

 

Pune News – (The Karbhari News Service) –  श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात गुरुवार, 9 जुलै  रोजी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने पालखी मार्गाची सविस्तर पाहणी करून वारकऱ्यांसाठीच्या सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. (Pune Municipal Corporation – PMC)

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि विभागप्रमुख या पाहणीत उपस्थित होते.

पाहणीनंतर झालेल्या बैठकीत येरवडा-कळस-धानोरी, औंध-बाणेर, भवानी पेठ आणि हडपसर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण हटाव, मुक्कामाची सुरक्षा, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा आणि पावसाळी गटार दुरुस्ती याबत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या.

मुख्य निर्णय आणि सूचना:

स्वच्छता आणि आरोग्य: पालखी मार्गावर 24 तास स्वच्छता ठेवण्याचे आदेश घनकचरा विभागाला देण्यात आले. वारकऱ्यांसाठी फिरते दवाखाने, इमर्जन्सी मेडिकल युनिट, मोबाईल टॉयलेट्स आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या शाळांमध्ये औषध फवारणीही केली जाणार आहे.
पाणी आणि गटार व्यवस्था: मलनिःसारण विभागाला म्हस्के वस्ती, कळस येथील नाल्यावरील कल्व्हर्टची साफसफाई आणि खोली वाढवण्याचे आदेश दिले. सर्व चेंबर्स तपासून लोखंडी जाळी बसवणे आणि पावसाळी पाईप दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.विद्युत आणि रस्ते: पालखी मार्गावर अखंड विद्युत पुरवठा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवण्याच्या सूचना विद्युत विभागाला दिल्या. पथ विभागामार्फत रस्ते, पदपथांची डागडुजी, सिमाभिंती स्वच्छ करणे आणि अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम होणार आहे.
वाहतूक आणि सुरक्षा: वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावरील बेवारस गाड्या, अडगळीच्या वस्तू आणि अतिक्रमण हटवण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले. विसाव्याच्या ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेड्स आणि अग्निशमन व्यवस्था उभारली जाणार आहे.
मुक्कामाची व्यवस्था: वारकऱ्यांसाठी विसावा आणि आराम कक्ष उभारले जाणार आहेत. मनपाच्या शाळांमध्ये मुक्काम असलेल्या दिंड्यांसाठी पाणी, शौचालय आणि स्वच्छतेची व्यवस्था केली जाणार आहे. संचेती चौक, विश्रांतवाडी चौक, एफसी रोड, अलका टॉकीज चौक येथे मोबाईल टॉयलेट्स आणि पाणी व्यवस्था केली जाणार आहे.

महापालिकेने पाणीपुरवठा विभागामार्फत पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास दुरुस्ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचेही नियोजन केले आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: