Shrinath Bhimale PMC | मुंढवा-केशवनगरमधील ८८ हेक्टर महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण मोकळे होणार

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | मुंढवा-केशवनगरमधील ८८ हेक्टर महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण मोकळे होणार

Ganesh Kumar Mule Jun 12, 2026 8:02 PM

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष
PMC Ward Committee Chairman Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष होणार बिनविरोध
Pune PMC Holidays | पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर | अतिरिक्त आयुक्त यांनी सर्कुलर केले जारी

Shrinath Bhimale PMC | मुंढवा-केशवनगरमधील ८८ हेक्टर महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण मोकळे होणार

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – मुंढवा-केशवनगर परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे ८८ हेक्टर क्षेत्रावरील वाढत्या अतिक्रमणांच्या पृष्ठभूमीवर ही जागा आरोग्य विभागाकडून काढून मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे वर्ग करण्यासह सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी स्थायी समितीसमोर करण्यात आली होती. या प्रस्तावाला मान्यता दिली असून अतिक्रमण मोकळे करण्याची कार्यवाही सुरु केली जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)

मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ६ तसेच सर्व्हे क्रमांक ९ ते १४/२ मधील एकूण ८८ हेक्टर ५७ आर क्षेत्राचा यात समावेश आहे. शासनाने ही जागा गोठ्यासाठी पुणे महापालिकेला दिली असून सध्या तिची देखभाल आणि व्यवस्थापन आरोग्य विभागाकडे आहे.

गेल्या काही वर्षांत या विस्तीर्ण जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पत्राशेड, पक्की बांधकामे, अनधिकृत ताबे तसेच राडारोडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. जागेच्या मोठ्या क्षेत्रफळामुळे आरोग्य विभागाला तिचे प्रभावी संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यात अडचणी येत असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित जागा आरोग्य विभागाकडून काढून पूर्वीप्रमाणे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्त मोहीम राबवून सर्व अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आणि अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय महापालिकेच्या जागेवर बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संपूर्ण जागेभोवती कुंपण किंवा संरक्षक भिंत उभारण्याबरोबरच ‘ही जागा पुणे महानगरपालिकेच्या मालकीची आहे’ असे फलक लावण्यात येणार आहे.

मुंढवा आणि केशवनगर परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असताना महापालिकेच्या मालकीच्या मोठ्या भूखंडांवर अतिक्रमणाचा धोका वाढत असल्याची बाब या प्रस्तावातून स्पष्ट करण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास संबंधित जागेवरील अतिक्रमणांविरोधात व्यापक कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: