Pune Property Tax | आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच पुणे मनपाला प्रॉपर्टी टॅक्समधून १२०० कोटींचे विक्रमी उत्पन्न

Homeadministrative

Pune Property Tax | आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच पुणे मनपाला प्रॉपर्टी टॅक्समधून १२०० कोटींचे विक्रमी उत्पन्न

Ganesh Kumar Mule Jun 01, 2026 7:52 AM

Mahatma Phule Jayanti | महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रिकरण | पुणे महापालिका या मिळकती तडजोडीने ताब्यात घेण्याबाबत  प्रयत्नशील 
BJP focus on PMC Election | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोड वर
Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Pune Property Tax | आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच पुणे मनपाला प्रॉपर्टी टॅक्समधून १२०० कोटींचे विक्रमी उत्पन्न

| ६० दिवसांत ६,४४,७०४ मिळकतधारकांनी भरला कर

 

PMC Property tax Department – (The Karbhari News Service) – २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दोन महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून तब्बल १२००.४७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या ५ ते १० टक्के सवलत योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने केवळ ६० दिवसांत ही ऐतिहासिक वसुली झाली आहे. (Ravi Pawar PMC)

३१ मे पर्यंत होती सवलत योजना

महापालिकेने सन २०२६-२७ साठी सोयीप्रमाणे कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ५ ते १० टक्के सवलत जाहीर केली होती. ३१ मे २०२६ पर्यंत ज्या नागरिकांनी संपूर्ण मिळकत कर विहित मुदतीत भरला, त्यांना या सवलतीचा लाभ देण्यात आला.

१५.७५ लाखांपैकी ६.४४ लाखांनी भरला कर

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण १५.७५ लाख इतकी मिळकतींची संख्या असून दि. ०१/०४/२०२६ ते दि. ३१/०५/२०२६ अखेर म्हणजे रात्री ९:३० वाजेपर्यंत ६,४४,७०४ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. १२००.४७ कोटी इतका मिळकतकर जमा केला आहे.

ऑनलाइन भरण्याकडे नागरिकांचा कल

६,०७,६१३ (९४.०६%) मिळकतधारकांनी रक्कम रु. ११४५.९३ कोटी इतकी रक्कम धनादेशाद्वारे जमा केली.  ३७,०९१ (५.९४%) इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. ५४.५३ कोटी इतकी रक्कम रोख स्वरूपात जमा केली.  यातील सर्वाधिक ५,७५,३९१ (९३.७०%) इतक्या नागरिकांनी ऑनलाइन / डिजिटल प्रणालीद्वारे रक्कम रु. ७७०.११ कोटी जमा केली आहे.

उप आयुक्त  कर आकारणी व कर संकलन प्रमुख तथा उप आयुक्त रवी पवार यांनी सांगितले की, “नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे केवळ दोन महिन्यात १२०० कोटींचा टप्पा पार झाला आहे. ऑनलाइन भरण्याचे प्रमाण ९३.७% इतके असणे ही बाब उल्लेखनीय आहे. ही वसुली मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय आहे.”

कर संकलन विभागाने नागरिकांनी वेळेत कर भरून महापालिकेच्या विकासकामांना हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0