PMC JE Exam Results | निवडणूक विभागाच्या उत्तरात संदिग्धता | कनिष्ठ अभियंता निकालासाठी महापालिका आता भारत निवडणूक आयोगाच्या दारी जाणार!

Homeadministrative

PMC JE Exam Results | निवडणूक विभागाच्या उत्तरात संदिग्धता | कनिष्ठ अभियंता निकालासाठी महापालिका आता भारत निवडणूक आयोगाच्या दारी जाणार!

Ganesh Kumar Mule May 30, 2026 8:19 AM

Prmaod Nana Bhangire on PMC JE Exam | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे
PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा 25 जानेवारी ला | महापालिका प्रशासनाकडून घोषणा
PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली! 

PMC JE Exam Results | निवडणूक विभागाच्या उत्तरात संदिग्धता | कनिष्ठ अभियंता निकालासाठी महापालिका आता भारत निवडणूक आयोगाच्या दारी जाणार!

 | १६९ पदांचा निकाल रखडल्याने उमेदवारांत संभ्रम

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांच्या भरती परीक्षेचा निकाल आदर्श आचारसंहितेत अडकला असून, याबाबत स्थानिक निवडणूक विभागाने दिलेल्या उत्तरात स्पष्टता नसल्याने पुणे महापालिका प्रशासनाने आता थेट भारत निवडणूक आयोगाकडे (ECI) धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर (Prajit Nair IAS) यांनी ही माहिती दिली. (PMC Junior Engineer Exam Results)

निवडणूक विभागाचे ‘संदिग्ध’ उत्तर

अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले की, निकाल जाहीर करण्याबाबत महापालिकेने निवडणूक विभागाकडे विचारणा केली होती. मात्र, विभागाकडून आलेल्या उत्तरात कुठलीही ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही. “आदेशानुसार कार्यवाही करा” असे ढोबळ व संदिग्ध उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे निकाल जाहीर करावा की थांबवावा, याबाबत प्रशासनाची कोंडी झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आचारसंहिता काळात असे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेता येते. त्यानुसार महापालिकेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवले होते.

कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांसाठी महापालिकेला ४१ हजार अर्ज आले होते. मात्र प्रत्यक्ष परीक्षेला केवळ ५० टक्के उमेदवार उपस्थित राहिले. परीक्षा होऊन महिना उलटला तरी निकाल जाहीर न झाल्याने हजारो उमेदवार संभ्रमात आहेत. आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया ठप्प झाल्याने उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

महापालिकेत अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर परिणाम होत आहे. रखडलेली भरती लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही होत आहे.

निकाल रखडल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. “आचारसंहिता हा प्रशासनाचा विषय आहे. आम्ही परीक्षा दिली आहे, त्यामुळे निकाल तरी जाहीर करा,” अशी आर्त मागणी उमेदवार करत आहेत. अनेक उमेदवार इतर नोकऱ्यांच्या संधी नाकारून या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

आता सर्वांचे लक्ष  भारत निवडणूक आयोगच या पेचातून मार्ग काढणार याकडे लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: