Pune PMC News | गणवेश न परिधान करणाऱ्या मोकादमाला १ हजार दंड; आरोग्य निरीक्षकांनाही गणवेश सक्तीचा

Homeadministrative

Pune PMC News | गणवेश न परिधान करणाऱ्या मोकादमाला १ हजार दंड; आरोग्य निरीक्षकांनाही गणवेश सक्तीचा

Ganesh Kumar Mule May 29, 2026 9:42 PM

PMC Ward 34 – Narhe Wadgaon Budruk | प्रभाग क्रमांक – ३४ –  नऱ्हे – वडगाव बुद्रुक | या प्रभागासाठी सर्वात जास्त म्हणजे २ हजार हून अधिक हरकती का आल्या? जाणून घ्या या प्रभागाची व्याप्ती आणि रचना 
Sanvidhan Rally  | पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न
Ajit Pawar | पाईट-खेड अपघात | मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune PMC News | गणवेश न परिधान करणाऱ्या मोकादमाला १ हजार दंड; आरोग्य निरीक्षकांनाही गणवेश सक्तीचा

| विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात कारवाई

 

PMC Solid Waste Management – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील एका मोकादमाने कर्तव्यावर असताना गणवेश परिधान न केल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली. अतिरिक्त आयुक्तांनी पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र सक्तीचे केल्याच्या आदेशानंतर ही पहिलीच कारवाई समोर आली आहे.  (Santosh Warule PMC)

विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेला मोकादम गणवेश न घालता कर्तव्यावर हजर झाला. याची दखल घेत प्रशासनाने त्याच्यावर १००० रुपयांचा दंड ठोठावला व तो वसूलही केला. “कर्तव्यावर असताना शिस्त पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण होण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने गणवेश व ओळखपत्र परिधान करणे गरजेचे आहे,” असे उपायुक्त संतोष वारुळे यांनी स्पष्ट केले.

आरोग्य निरीक्षकांनाही सक्ती: अतिरिक्त आयुक्तांचा आदेश

दरम्यान, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी दि. २७  रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजादरम्यान गणवेश व ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक स्वच्छतेच्या कामकाजाच्या देखरेखीसाठी परिमंडळ कार्यालय स्तरावर उप प्रमुख आरोग्य निरीक्षक तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक या संवर्गातील पर्यवेक्षकीय अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांना गणवेश सक्तीचा आहे.
अनेक वेळा उप प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याकडून दैनंदिन कामकाजा दरम्यान गणवेश व ओळखपत्र परिधान केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य निरीक्षक संवर्गामार्फत सार्वजनिक स्वच्छता विषयक कामकाजा सोबतच दंडात्मक कारवाईचे कामकाज देखील केले जात असते. या अनुषंगाने कार्यालयीन शिस्त, ओळख व कामकाजातील एकसूत्रता राखणे तसेच विभागाची प्रतिमा अधिक प्रभावी राहण्यासाठी गणवेश व ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य आहे.

वरिष्ठांचे पाहणी दरम्यान उप प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी गणवेश व ओळखपत्र परिधान केले नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आदेशात देण्यात आला आहे.

मोकादमावरील कारवाईनंतर आता आरोग्य निरीक्षक संवर्गावरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. गणवेश नसल्याने नागरिकांना अधिकाऱ्यांची ओळख पटत नाही, तसेच शिस्तीचा अभाव दिसून येतो, या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. यापुढे गणवेशाशिवाय फिल्डवर आढळल्यास थेट कारवाई होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: