Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद |  बुधवारी कमी दाबाने पाणी  

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद |  बुधवारी कमी दाबाने पाणी  

Ganesh Kumar Mule May 29, 2026 8:10 PM

PMC JE RR | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या सेवा नियमात बदल करण्याची मागणी 
Mohan Bhagwat | सेवा हा माणुसकीचा धर्म | डॉ. मोहन भागवत
Pune Grand Tour 2026 | पुणे महापलिका पथ विभागाचे पुणेकर नागरिकांना आवाहन

Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद |  बुधवारी कमी दाबाने पाणी

 

Pune News – (The Karbhari News Service) –  मंगळवार दि. ०२ जून रोजी लष्कर पाणीपुरवठा केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरसी टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या येरवडा परिसरासह १० भागांतील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  (Pune Water cut on Tuesday)

मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहिल्याने बुधवार दि. ०३  रोजी या सर्व भागांत कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

प्र. अधीक्षक अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग, वीरेंद्र केळकर यांनी नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लष्कर जलकेंद्र भागाअंतर्गत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे:

ठाकरसी टाकीवरील संपूर्ण येरवडा परिसर,  संगमवाडी,  गांधीनगर,  संपूर्ण कल्याणीनगर,  बंगला नं. ५ काही भाग,  लूप रोड लगत शासकीय वसाहतचा भाग,  जय जवान नगर,  युपी हॉटेल संगमवाडी,  रामनगर,  लक्ष्मीनगर, कोरेगाव पार्क अंतर्गत होणाऱ्या भागातील पाणीपुरवठा.

.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: