PMC Kamgar Union | जनगणना करणाऱ्या महिला प्रगणकावर हल्ला; कामगार युनियन आक्रमक | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ४ प्रमुख केल्या मागण्या

Homeadministrative

PMC Kamgar Union | जनगणना करणाऱ्या महिला प्रगणकावर हल्ला; कामगार युनियन आक्रमक | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ४ प्रमुख केल्या मागण्या

Ganesh Kumar Mule May 29, 2026 1:37 PM

Postal Life Insurance Policy | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पोस्ट विभाग देणार “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” ची  माहिती!
PMC Circular DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात दोन महिन्याचा फरक दिला जाणार
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा बुधवारी सन्मान

PMC Kamgar Union | जनगणना करणाऱ्या महिला प्रगणकावर हल्ला; कामगार युनियन आक्रमक | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ४ प्रमुख केल्या मागण्या

| आयुक्त आणि महापौर यांना दिले पत्र

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – मुकुंदनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेचे (सर्व्हे) काम करणाऱ्या मनपा महिला प्रगणकावर व तिच्या मुलावर स्थानिक नागरिकांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, ‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’ने मनपा आयुक्तांना आणि महापौरांना पत्र देऊन तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोषींवर तातडीने निषेधार्ह कारवाई न झाल्यास संपूर्ण जनगणनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनने दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

काय आहे प्रकरण?

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुकुंदनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत शासकीय काम करत असलेल्या एका महिला मनपा सेविकेला अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले. तसेच या प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या मुलाला स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन बेदम मारहाण केली. ही घटना अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि शासकीय व्यवस्थेला आव्हान देणारी असल्याचे युनियनने म्हटले आहे.

युनियनने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, “शहरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक न राहिल्याने शासकीय कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे वारंवार हल्ले होत आहेत. यामुळे फिल्डवर काम करणाऱ्या मनपा सेवकांमध्ये, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांची सुरक्षितता नसेल, तर त्यांनी जनतेची सेवा कशी करावी?”

 

युनियनच्या ४ प्रमुख मागण्या

या घटनेच्या पार्श्वभूमीवर युनियनने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी व हक्कासाठी ४ तातडीच्या मागण्या केल्या आहेत:

पोलीस/मनपा सुरक्षा रक्षकांचे संरक्षण: जनगणना किंवा फिल्डवरील सर्वेक्षणातील काम करत असताना महिला सेविका व प्रगणकांना आवश्यकतेनुसार पोलीस किंवा मनपा सुरक्षा रक्षकांचे संरक्षण पुरवण्यात यावे. सुरक्षेची कोणीही हानी नसताना कर्मचाऱ्यांना फिल्डवर पाठवू नये.

अतिरिक्त मृत्यू भरपाई: जनगणनेचे शासकीय काम करत असताना एखाद्या सेवकाचा दुर्दैवी अंत झाल्यास, त्याच्या कुटुंबाला आधार म्हणून जनगणना विभागाकडून अतिरिक्त ५ कोटी रुपयांची आर्थिक भरपाई तात्काळ देण्यात यावी.

अपघात/हल्ल्यात आर्थिक मदत: कर्तव्य बजावत असताना अपघाती किंवा हिंसक हल्ल्यामुळे कर्मचाऱ्याचा अंशतः किंवा पूर्णतः अपंगत्व आल्यास, प्रशासनाने त्याच्या वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून ५० लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत द्यावी.

पेट्रोल भत्ता: सध्या जगभरात आणि देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशा महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खर्चाने सर्वेक्षणासाठी फिरणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले आहे. त्यामुळे जनगणनेचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘विशेष पेट्रोल अलाउन्स’ (इंधन भत्ता) दशसह मंजूर करण्यात यावा.

‘संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल’

“या गंभीर घटनेची पोलीस प्रशासन आणि आपण स्वतः तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा, संघटनेच्या वतीने जनगणनेचे संपूर्ण कामकाज तातडीने ‘संघटनात्मक बहिष्कार’ टाकण्यात येईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला संपूर्ण मनपा प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा युनियनने पत्रात दिला आहे.

हे पत्र दि. २९ रोजी ‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’च्या वतीने आयुक्तांना आणि महापौरांना देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: