Pune Breaking News | मुकुंदनगरात जनगणना करणाऱ्या मनपा महिला सेविकेला शिवीगाळ, मुलाला बेदम मारहाण

Homeadministrative

Pune Breaking News | मुकुंदनगरात जनगणना करणाऱ्या मनपा महिला सेविकेला शिवीगाळ, मुलाला बेदम मारहाण

Ganesh Kumar Mule May 28, 2026 11:03 PM

PMC pune| CHS | अंशदायी वैद्यकीय योजने वरून कर्मचारी संघटना आक्रमक |  पालकमंत्र्यांची घेतली भेट  | पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रशासना सोबत करणार चर्चा 
Pune PMC News | शीतल वाकडे यांच्या नियुक्तीला पुणे महापालिकेत विरोध | महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना 
PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी 

Pune Breaking News | मुकुंदनगरात जनगणना करणाऱ्या मनपा महिला सेविकेला शिवीगाळ, मुलाला बेदम मारहाण

| पीएमसी एम्प्लॉईज युनियनचा इशारा: दोषींवर गुन्हे न झाल्यास जनगणनेच्या कामावर ‘संघटनात्मक बहिष्कार’

Pune PMC News – (The Karbhari News Service) – बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुकुंदनगर येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेचे काम करणाऱ्या मनपा महिला सेविकेला शिवीगाळ करून अपमानित केल्याची, तसेच जाब विचारणाऱ्या तिच्या मुलाला स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पीएमसी एम्प्लॉईज युनियनने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Pune PMC News)

मिळालेल्या माहितीनुसार, मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या मनपा महिला प्रगणक सेविकेला काही स्थानिक नागरिकांनी अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ केली. हा प्रकार समजल्यानंतर तिचा मुलगा जाब विचारण्यासाठी घटनास्थळी गेला असता, जमावाने त्यालाही बेदम मारहाण केली.

या घटनेचा निषेध करत पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष म्हणाले, “पुण्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर हात उचलण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आतातर अशा लोकांचे मनोधैर्य वाढत चालले आहे, जे आम्ही खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण देणे ही संपूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे.”

युनियनने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. “जर आमच्या कर्मचाऱ्यांना रोज जीव मुठीत धरून काम करावे लागणार असेल, तर त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. दोषींवर कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव सुरू असलेल्या जनगणनेच्या कामकाजावर पूर्णपणे संघटनात्मक बहिष्कार टाकला जाईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा युनियनने दिला आहे.

दरम्यान, कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे मनपा सेवकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: