PMC Employees DA Hike | पुणे मनपा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८% वरून ६०% |  जूनच्या पगारात मिळणार ४ महिन्यांची थकबाकी

Homeadministrative

PMC Employees DA Hike | पुणे मनपा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८% वरून ६०% |  जूनच्या पगारात मिळणार ४ महिन्यांची थकबाकी

Ganesh Kumar Mule May 26, 2026 8:28 AM

HRA Hike Latest News | Another gift to central employees after DA increase | HRA increased by 3 percent
DA Hike Update | 7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
7th pay Commission |केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!  | नवीन वर्षात महागाई भत्ता (DA) मोजण्याचे सूत्र बदलणार!

PMC Employees DA Hike | पुणे मनपा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८% वरून ६०% |  जूनच्या पगारात मिळणार ४ महिन्यांची थकबाकी

 

DA Hike News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ५८ टक्क्यांवरून आता हा दर ६० टक्के झाला आहे. मुख्य लेखा व वित्त विभागाने २५ मे रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले. (Dearness Allowance Hike News)

कधीपासून लागू?

केंद्र शासनाच्या धर्तीवर ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. महापालिका मुख्य सभा ठराव नुसार केंद्राप्रमाणे डीएमध्ये बदल करण्यास मनपाची धोरणात्मक मान्यता आहे.

कोणाला किती फायदा?

कार्यरत अधिकारी व कर्मचारी: सध्या ५८% दराने महागाई भत्ता मिळत होता. आता १ जानेवारी २०२६ पासून २% वाढवून ६०% दराने डीए मिळेल.

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व कुटुंब सेवानिवृत्तीवेतनधारक: यांनाही १ जानेवारी २०२६ पासून ५८% वरून २% वाढवून एकूण ६०% दराने महागाई भत्ता फरकासह अदा केला जाणार आहे.

थकबाकी कधी मिळणार?

कार्यरत कर्मचारी: जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या ४ महिन्यांचा २% दराने फरकाची रक्कम मे २०२६ पेड इन जून २०२६ च्या वेतनातून दिली जाईल.

सेवानिवृत्त कर्मचारी: जानेवारी २०२६ ते मे २०२६ या ५ महिन्यांचा फरक जून २०२६ पेड इन जुलै २०२६ च्या निवृत्ती वेतनातून अदा होईल.

मे २०२६ च्या पगारापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना दरमहा ६०% दराने, तर जून २०२६ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांना ६०% दराने महागाई भत्ता मिळेल.

सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी सर्व खातेप्रमुखांना वेतन लिपिकांमार्फत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महागाई भत्त्याचा खर्च ‘२८ महागाई भत्ता’ या अंदाजपत्रकीय तरतुदीतून करण्यात यावा, असेही स्पष्ट केले आहे.

या वाढीमुळे पुणे मनपातील सुमारे २० हजार कार्यरत व ८ हजार निवृत्त कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिलासा मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0