NCP -SCP on Tree Cutting | गणेशखिंड रस्त्यावरील 500 हून अधिक झाडांच्या तोडीवरून वाद |  राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

Homeadministrative

NCP -SCP on Tree Cutting | गणेशखिंड रस्त्यावरील 500 हून अधिक झाडांच्या तोडीवरून वाद |  राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

Ganesh Kumar Mule May 23, 2026 2:59 PM

Pavneet Kaur IAS | किटक प्रतिबंधक विभागातील १०० कर्मचाऱ्यांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे परिपत्रक जारी
PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर
Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी 10 कोटींचे वर्गीकरण | आतापर्यंत 44 पिअरचे काम पूर्ण

NCP -SCP on Tree Cutting | गणेशखिंड रस्त्यावरील 500 हून अधिक झाडांच्या तोडीवरून वाद |  राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

 

Pune News – (The Karbhari news Service) –  गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रोसह इतर विकासकामांसाठी होणाऱ्या 500 हून अधिक झाडांच्या तोडीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. पक्षाच्या वतीने माजी खासदार वंदना चव्हाण यांनी मनपा आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांना निवेदन देऊन दोन गंभीर बाबींकडे लक्ष वेधले. (Pune PMC News)

एकात्मिक आराखड्याचा अभाव

निवेदनात म्हटले आहे की, गणेशखिंड रस्ता हा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या परिसरात विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, वित्तसंस्था, शासकीय व वैज्ञानिक संस्था, रुग्णालये, न्यायालये, राजभवन तसेच बाणेर, औंध, बालेवाडीसारख्या भागांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होत असताना या रस्त्याचा सर्वसमावेशक एकात्मिक नियोजन आराखडा उपलब्ध नसणे धक्कादायक आहे. रस्ता विकसित करण्यापूर्वी वैज्ञानिक निकषांवर आधारित आराखडा आवश्यक असतो. यात भविष्यातील वाहतूक भार, वहन क्षमता, IRC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पदपथ, सायकल ट्रॅक, मल्टी युटिलिटी झोन, मेट्रो व सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरक्षित पादचारी मार्गिका, पार्किंग, हरित पट्टे यांचे नियोजन अपेक्षित असते. मात्र गणेशखिंड रस्त्याबाबत असा आराखडा नसल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रतिपूरक वृक्षारोपणात कायदेशीर त्रुटी

महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 आणि आरे जंगल प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रतिपूरक वृक्षारोपण बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
प्रमुख त्रुटी अशा:  वृक्षतोडीपूर्वी झाडांच्या वयाची अचूक नोंद न करणे  15 दिवसांच्या आत प्रतिपूरक वृक्षारोपण न करणे  Geo-Tagging व GIS Mapping चा अपुरा वापर  लावलेल्या झाडांचे तीन वर्षांसाठी सहामाही निरीक्षण अहवाल न देणे  झाडे 7 वर्षे जिवंत ठेवण्याची जबाबदारी न पाळणे  माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक न करणे  प्रतिपूरक वृक्षारोपणासाठी स्वतंत्र समिती स्थापन न करणे  देशी झाडांसाठी ‘Land Bank’ विकसित न करणे  संरक्षणासाठी कुंपण, CCTV, Tree Guards ची अपुरी व्यवस्था  वनीकरण केलेल्या जागा ‘Urban Green Belt’ व ‘No Development Zone’ म्हणून घोषित न करणे.

राष्ट्रवादीच्या मागण्या

गणेशखिंड रस्त्यासाठी तातडीने सर्वसमावेशक एकात्मिक आराखडा जाहीर करावा. असा आराखडा यापूर्वी का तयार केला नाही याचे स्पष्टीकरण द्यावे.  प्रतिपूरक वृक्षारोपणाच्या सर्व कायदेशीर तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी. आवश्यक वृक्षारोपणाचा सविस्तर आढावा जाहीर करावा आणि मनपाने तातडीने ‘Land Bank’ विकसित करावा.

‘आमची भूमिका विकास विरोधी नाही’ – वंदना चव्हाण

“आमची भूमिका विकासविरोधी नसून नियोजनशून्य, पर्यावरणविरोधी आणि कायदेशीर प्रक्रियांना डावलणाऱ्या पद्धतीविरोधात आहे. पुण्याची हरित ओळख आणि भावी पिढ्यांचा पर्यावरणीय हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक, समन्वित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे माजी खासदार वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मेट्रोसाठी झाडे तोडताना पर्यायी नियोजन आणि कायद्याचे पालन होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: