PMC Light Bill | विद्युत शेगड्यांचा वापर तातडीने बंद करा | विजेचा गैरवापर करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा
| महापालिकेवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या विविध कार्यालयात विजेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त वीज बिल येत आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्त प्रजीत नायर (Prajit Nair IAS) यांनी एक आदेश जारी केला आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त यांनी विद्युत शेगड्यांचा वापर तातडीने बंद करण्याचे आदेश कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच विजेचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील अतिरिक्त आयुक्त यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारत (नवीन व जुनी) व महानगरपालिकेच्या अंतर्गत सर्व आस्थापना कार्यालयांमधील अनावश्यक वीज वापराबाबत सभासद व नागरिक यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. कार्यालयीन कामाकरीता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करुन, अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलीत यंत्रणा, उद्वाहन इ. उपकरणे बंद करावीत. तसेच, वातानुकूलीत यंत्रणेचे तापमान २४-२६ अंशावर ठेवावे असे राज्य सरकारच्या आदेशात नमूद आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अधिनस्थ सर्व कार्यालयांमध्ये असलेले विविध उपकरणे उदा. पंखे, दिवे, वातानुकूलीत यंत्रणा, संगणक, इलेक्ट्रिक शेगड्या इ. विद्युत यंत्रणा कार्यालयीन वेळेनंतरही कर्मचारी बंद करीत नसलेचे निदर्शनास येत आहे. तसेच कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित नसतानाही अनेक दालनांमध्ये वरील वीज उपकरणे पूर्ण क्षमतेने चालू असतात. कर्मचाऱ्यांचे बेजबाबदारपणामुळे विजेचा अनियंत्रित वापर होत असल्याने पुणे महापालिकेच्या बीज विलात मोठी वाढ होऊन सार्वजनिक तिजोरीवर अनावश्यक ताण पडत आहे. असे अतिरिक्त आयुक्त यांनी म्हटले आहे.
या उपाययोजना करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश
१) सर्व कार्यालयातील विद्युत शेगड्यांचा वापर तातडीने बंद करण्यात यावा व विजेची बचत करावी.
२) प्रत्येक कार्यालयाने आपल्या अधीनस्थ कर्मचान्यांमधून एकाची समन्वयक म्हणून नेमणूक करावी. समन्वयक कार्यालय सोडताना वीज उपकरणे बंद असल्याची खात्री करणे अपेक्षित आहे.
३) कार्यालयातील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, विविध विद्युत उपकरणे ई. विनाकारण चालू राहणार नाहीत याची दखल घेण्यात यावी तसेच विजेचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी व कर्मचान्यांवर प्रशासकीय नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

COMMENTS