Shrinath Bhimale PMC | कात्रज-शनिवारवाडा पेशवेकालीन जलवाहिनीच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा!

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | कात्रज-शनिवारवाडा पेशवेकालीन जलवाहिनीच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा!

Ganesh Kumar Mule May 15, 2026 8:02 AM

Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी 10 कोटींचे वर्गीकरण | आतापर्यंत 44 पिअरचे काम पूर्ण
Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 
Pune PMC Election | समाविष्ट ३२ गावांसाठी योग्य प्रभाग रचना करण्यासाठी कायद्यात बदल करावेत | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी 

Shrinath Bhimale PMC | कात्रज-शनिवारवाडा पेशवेकालीन जलवाहिनीच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा!

|
स्थायी समितीची मान्यता,श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पेशवेकालीन कात्रज ते शनिवारवाडा भूमिगत पाणीपुरवठा योजनेचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या समितीसमोर मांडण्यात आला होता. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे मत व्यक्त करत या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune Breaking News)

पेशवे काळात उभारण्यात आलेली ही योजना त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. कात्रज तलावातून नैसर्गिक उताराचा वापर करून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील शनिवारवाडा परिसरात भूमिगत दगडी व मातीच्या पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्या काळातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जलव्यवस्थापनाचा हा आदर्श उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले.

मात्र, सध्या या ऐतिहासिक जलवाहिनीचे अनेक अवशेष दुर्लक्षित अवस्थेत असून काही भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या वारशाचे जतन करण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाचे पुरातत्व आणि तांत्रिक सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

या अंतर्गत अस्तित्वात असलेल्या भूमिगत पाइपलाईन, हौद आणि जलसाठ्यांचे जतन व पुनर्बांधणी करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या योजनेला ‘वारसा संवर्धन प्रकल्प’ घोषित करून नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीफलक, अभ्यासदौरे आणि वारसा पर्यटन उपक्रम सुरू करण्याचाही विचार आहे.

या कामासाठी राज्य पुरातत्व विभाग आणि इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, तसेच विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सुहास टिंगरे यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: