Pune Pratham Branding | “पुणे प्रथम” च्या माध्यमातून शहराची केली जाणार ब्रॅण्डिंग!
| प्रत्येक प्रकल्पात आणि धोरणात ब्रॅण्डिंगचा वापर करणे अनिवार्य
| पक्षनेते बैठकीत महापौरांच्या प्रस्तावाला मान्यता
Mayor Manjusha Nagpure – (The Karbhari News Service) – पुणे शहराची पुणे प्रथम च्या माध्यमातून ब्रॅण्डिंग केली जाणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रकल्पात आणि धोरणात याचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी पक्षनेते यांच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. (Pune PMC News)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ६३ (२९) नुसार शहराचे सुशोभीकरण आणि सुशासनासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे महानगरपालिकेचे स्वेच्छाधीन कर्तव्य आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात पुणेकरांचा सक्रिय सहभाग आणि जन-संवादाची भावना म्हणजेच ‘पुणे प्रथम’ असून, या माध्यमातून लोकसहभागातून शहराचे ब्रॅण्डिंग अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
‘पुणे प्रथम’ ही संकल्पना पुणे महानगरपालिकेची अधिकृत ‘Theme’ म्हणून स्वीकारण्यात आली आहे.. पुण्याचा मांस्कृतिक वारसा आणि आधुनिक प्रगती यांचा संगम दर्शविणाऱ्या विशेष बोधचिन्हास (Logo) अंतिम मंजुरी दिली आहे.
या संपूर्ण बँडिंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हेरिटेज विभाग यांची ‘नोडल विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागावर खालील जबाबदाच्या निश्चित करण्यात येत आहेतः
मसुदा व मान्यता (Docketing): या धोरणाचा सविस्तर मसुदा (Policy Draft) तयार करून त्यावर आयुक्तांची प्रशासकीय मान्यता मिळवणे.
कायदेशीर नोंदणीः भारतीय बोधचिन्ह आणि नाव अधिनियम, १९५० व ट्रेडमार्क कायद्यानुसार लोगो व टॅगलाईनची बौद्धिक मालमत्ता (IPR) म्हणन नोंदणी करणे.
.
लॉन्चिंग सोहळाः ‘पुणे प्रथम’ नाममुद्रेच्या (Brand) अधिकृत लॉन्चिंगसाठी भव्य सार्वजनिक न कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व प्रसिद्धी करणे.
समन्वयः महानगरपालिकेच्या इतर सर्व विभागांकडून याची अंमलबजावणी व अनुपालन करून घेणे, ही कामे देण्यात आली आहेत.
वारसा स्थळांच्या (Heritage Sites) ठिकाणी अंमलबजावणी करताना हेरिटेज विभागाची तांत्रिक मान्यता व देखरेख अनिवार्य असेल. ऐतिहासिक वास्तूंच्या मूळ सौंदर्याला बाधा न आणता ‘पुणे प्रथम’ ब्रॅंडिंगचा दर्जा राखण्याची जबाबदारी हेरिटेज विभागाची असेल.
यापुढे कोणत्याही नवीन प्रकल्पाचे नियोजन किंवा अंदाजपत्रक मंजूर करताना, त्यामध्ये ‘पुणे प्रथम’ ब्रेडिंगचा अंतर्भाव असणे बंधनकारक राहील. ज्या प्रकल्पांच्या आराखड्यात या सुधारित निकषांचा समावेश नसेल, त्यांना प्रशासकीय मान्यता (Administrative Approval) प्रदान केली जाणार नाही.
कुठे वापर करता येणार!
स्थापत्य व विकासकामेः इमारती, उद्याने, उड्डाणपूल आणि प्रकल्प माहिती फलक.
प्रशासकीय कामकाजः अधिकृत पत्रके, निविदा सूचना आणि जाहिराती.
सर्व सोशल मीडिया व वेबसाईटवर वापर. सार्वजनिक सेवा: PMPML बस सेवा, कचरा संकलन वाहने व महापालिकेची सर्व वाहने.

COMMENTS