Raj Thackeray on Maharashtra Politics | महाराष्ट्रचे वाटोळे केवळ राजकारणी लोकांमुळे झाले – राज ठाकरे यांचे परखड मत
Vasant Vyakhyanmala Pune – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रचे वाटोळे केवळ राजकारणी यांच्यामुळे झाले आहे असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ऐतिहासिक परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ते ‘ माझ्या मनातील महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी व्याख्यानमाला अध्यक्ष रोहित टिळक उपस्थित होते. (Pune News)
ठाकरे म्हणाले, बाहेरील राज्यातील लोंढे हे महाराष्ट्रात येतात कारण जे वातावरण महाराष्ट्रात आहे ते देशात कुठेही नाही. राज्यातील माणूस कोणाला वेड्यावाकड्या नजरेने पाहत नाही, छेडछाड करत नाही. दिल्ली सारखा ठिकाणी बस मध्ये देखील महिलांना प्रवास करण्यास भीती वाटते. देशाच्या राजधानीत महिला असुरक्षित वाटत असेल तर मुंबई, पुण्यात अनेकजण सुरक्षित वातावरणामुळे स्थायिक झाले. मोकळेपणा हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य ज्यांनी स्वतःच्या प्रदेशावर राज्य केले. परंतु ब्रिटिश येऊन गेल्यावर आपण आपली ताकद विसरून गेलो आहे.
राज ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. महाराष्ट्राने कसे वागले पाहिजे, कसे राहावे हे त्याचकाळात त्यांनी सांगितले आणि दाखवून दिले. महाराष्ट्र एकमेव देशातील राज्य आहे ज्यातील कोणतेही क्षेत्र काढले तर अद्भुत पराक्रम गाजवलेली लोके मिळून येतील. परंतु त्यांचे कर्तृत्व आपण विसरलो ही शोकांतिका आहे. आपल्या लोकांचे जे कर्तृत्व आहे त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी शब्दकोश निर्मितीचे काम शिवाजी महाराजांनी केले. महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी केवळ साजरे करून चालणार नाही तर त्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा कर्तृत्व आणि ओळख ही काय याचा विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती ही विविध ठिकाणी आहे.
राज्यातील संत परंपरा यांनी समाजातील वैचारिक मशागत केली. जातीभेद निर्मूलन केले आणि समाज घडवला. स्वच्छ भारत योजनेचे खरे दूत हे गाडगेबाबा आहे. मराठी भाषा प्राचीन असल्याने त्याला अभिजात भाषा दर्जा मिळाला. हिंदी ही १५० वर्षा पूर्वीची केवळ भाषा असून त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अजून एक हजार वर्ष लागतील. मात्र, तरी हिंदी भाषा सक्तीचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाषेबाबत आपण कडवट राहणे गरजेचे आहे. मात्र,आपण आपले लेखक,कवी यांना देखील जातीत विभागात आहे. भाषा कोणती वाईट नसते पण आपली मातृभाषा याचा अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा टिकवण्यासाठी तिचे जतन वरपासून खालपर्यंत सर्वांनी करणे आवश्यक आहे. परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन जर त्यांच्या भाषेच्या पाट्या वापरत असतील आणि मराठी भाषेला विरोध करत असतील तर त्याला मनसेचा तीव्र विरोध राहील. असा इशारा ठाकरे यांनी दिला.

COMMENTS