Fursungi Uruli Devachi Nagar Parishad | पाणी, कचरा सहित आमची सर्व विकासकामे पुणे मनपा ने करावीत | फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अजब दाव्याने महापालिका चक्रावली!

Homeadministrative

Fursungi Uruli Devachi Nagar Parishad | पाणी, कचरा सहित आमची सर्व विकासकामे पुणे मनपा ने करावीत | फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अजब दाव्याने महापालिका चक्रावली!

Ganesh Kumar Mule Apr 30, 2026 7:04 AM

PMC 75th Anniversary | पुणे महापालिकेच्या ४३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी!
PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १ नोव्हेंबर ला कागदपत्रांची छाननी | जाणून घ्या सविस्तर
NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

Fursungi Uruli Devachi Council | पाणी, कचरा सहित आमची सर्व विकासकामे पुणे मनपा ने करावीत | फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या अजब दाव्याने महापालिका चक्रावली!

 

By Ganesh Mule.

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेने अजब दावा करत पुणे महापालिकेकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. कचरा, पाणी सहित आमची सर्व विकासकामे पुणे मनपाने करावीत, असा ठरावच नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी महापालिकेला पत्र देत विकासकामे करण्याची मागणी केली आहे. मात्र या अवास्तव मागण्यामुळे पुणे महापालिका प्रशासन मात्र चक्रावून गेले आहे. विकास कामे जर पुणे मनपानेच करायची आहेत, तर महापालिका हद्दीतील या दोन गावांची नगरपरिषद कशाला केली, असा प्रश्न आता महापालिका वर्तुळात विचारला जात आहे. (Pune Breaking News)

फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळून ११ सप्टेंबर २०२४ रोजी फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे- २०१७ मध्ये सदर गावे पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. तत्पूर्वी सदर गावांमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात होती.

२०१७ पूर्वी तत्कालीन ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये पुणे महानगरपालिकेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प होता या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. तसेच डेपो मधून येणारा लिचेटमुळे परिसरातील भूजल साठे सुद्धा दूषित झाले असून अनेक विहिरी व बोअरवेलमधील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नव्हते. यामुळे फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून याबाबतीत पुणे महानगरपालिकेकडे आपला निषेध नोंदवला होता. या सर्व प्रदूषणामुळे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडेही दावा दाखल करण्यात आला होता. या  प्रकरणाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत सन २०१० पासून फुरसुंगी व उरुळी गावातील बाधित भागांमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा विचार करून दररोज दोन्ही गावांना मिळून  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच कचरा डेपोमुळे बाधित परिसर याच्या विकासासाठी कॉम्पेन्सेशन किंवा भरपाई म्हणून या दोन्ही गावांमध्ये करोडो रुपयांची विकास कामे पुणे महानगरपालिकेत मार्फत करण्यात येत होती. तथापि मध्यंतरीच्या काळामध्ये सदर दोन्ही गावे पुणे मनपामध्ये समाविष्ट करण्यात आली व त्यानंतर २०२४ झाली ती महानगरपालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र फुरसुंगी- उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्यात आल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा व कचऱ्याच्या प्रदूषणामुळे पर्यावरण व आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम याची भरपाई म्हणून पुणे मनपामार्फत दरवर्षी करण्यात येणारी दहा कोटींची कामे सद्यस्थितीत बंद करण्यात आलेली आहेत.

मात्र आता नगरपरिषदेने पुन्हा ही विकास कामे महापालिकेने करावीत, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. त्यानुसार या मागण्या करण्यात आल्या आहेत.

१) २०१७ पूर्वी ज्याप्रमाणे दरवर्षी प्रत्येक गावासाठी दहा कोटी अश्याप्रमाणे २० कोटींची विकासकामे केली जात असत त्याचप्रमाणे सद्यस्थितीत ही अशाच प्रकारे ४० कोटींची विकास कामे बाधित क्षेत्रात करण्यात यावी.
२) कचरा डेपो बाधित क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा विषयक वितरण व्यवस्थेचे काम करावे.
३) तसेच दररोज १८० टँकर इतके पाणीपुरवठा नगरपरिषद हद्दीमध्ये करण्यात यावा.
४) अलीकडच्या काळात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते तरी नगरपरिषदेला मंजूर असलेला २४ एम एल डी पाणीपुरवठा नगरपरिषद हद्दीमध्ये दररोज करण्यात यावे.
५)तसेच पाणीपुरवठा विषयक देखभाल व दुरुस्ती कामे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलवाहिन्यांची देखभाल, जलशुद्धीकरण यंत्र चालविणे व संबंधित वीज खर्च आदी कामे सध्या पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहेत त्या यापुढेही चालू ठेवण्यात याव्या.
६) उरुळी देवाची व फुरसुंगी परिसरातील नगरपरिषद हद्दीतील दुषित झालेल्या ओढ्यावर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणेच्या दृष्टीने होळकरवाडी व हांडेवाडी येथून येणारे सांडपाणी थेट ओढ्यात मिसळू नये यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस ड्रेनेज लाईन उभारून ती उरुळी देवाची गावातून ते फुरसुंगी गावातून ते नगरपरिषद हद्दीपर्यंत टाकण्यात यावी.

आता यावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: