Pune Overhead Cable SOP |  ओव्हरहेड केबल ची SOP लवकरच आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवली जाणार 

Homeadministrative

Pune Overhead Cable SOP |  ओव्हरहेड केबल ची SOP लवकरच आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवली जाणार 

Ganesh Kumar Mule Apr 21, 2026 8:37 PM

Pune Bhidewada Smarak | मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार : अजित पवार यांनी केली स्मारकाच्या जागेची पाहणी
Kothrud Police Pune  | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोथरुडच्या जिगरबाज पोलिसांचा सत्कार
PMC 75th Anniversary | पुणे महापालिका सर्व माजी नगरसेवकांना आणणार एकत्र!

Pune Overhead Cable SOP |  ओव्हरहेड केबल ची SOP लवकरच आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवली जाणार

| आज अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

 

Pune PMC News – (TheKarbhari News Service) – पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड केबलचे जाळे शिस्तबद्ध करणे आणि टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यासाठी मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) SOP करण्यासाठी आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्यासाठी अंतिम मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) SOP ड्राफ्टमहापालिका आयुक्त यांचेकडे सादरीकरण करण्यात यावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. (PMC Overhead Cable Policy)

बैठकीमध्ये पुणे शहरात कोणत्या प्रकारच्या ओव्हरहेड केबल टाकण्यात येतात याविषयी विस्तृत चर्चा झाली. टेलीकम्युनिकेशन अॅक्टनुसार तसेच पॉलीसीनुसार पुणे मनपाकडून ओव्हरहेड केबल कोणत्या पद्धतीने टाकणे व त्यासाठी आवश्यक परवानग्या देणे याबाबत त्वरित कार्यवाही करण्यासाठी  बैठकीमध्ये   निर्देश व सूचना देण्यात आल्या.

• ओव्हरहेड केबल्सबाबत यापूर्वी केलेले सर्वेक्षण विचारात घेऊन शहरातील उर्वरित सर्वेक्षण न केलेल्या भागांचे सर्वेक्षण करणेत यावे.
• नागरिकांना अडथळा, अपघात होणार नाही तसेच शहराचे सौंदर्यीकरणास अडथळा येणार नाही अशा पद्धतीने ओव्हरहेड केबल्स व्यवस्थापन करण्यात यावे.
• हैदराबाद शहराच्या उदाहरणाप्रमाणे पुणे शहरातील ओव्हरहेड केबलसाठी असणारी उंचीची मर्यादा, ओव्हरहेड केबल ओढणेसाठी स्वतंत्र पोल उभारणी करायची असल्यास त्यानुसार भाडे दर आकारणी प्रस्ताव तयार करावा.
• पथ विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रोड क्रॉसिंगच्या ठिकाणी भूमिगत डक्ट मार्फतच केबलिंग करण्याची तरतूद करावी.
• केबल सुविधा पुरविणारे अर्जदार यांचेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे व परवानगी प्रक्रिया देणेबाबत संगणक प्रणाली वापरावी. ऑनलाईन पोर्टलद्वारे मंजुरी प्रक्रिया कार्यवाही होईपर्यंत एक खिडकी योजनेद्वारे मंजुरीची कार्यवाही मुदतीत करावी.
• मनपाकडून तसेच सर्व शासकीय विभागाकडून उदा. पोलीस, वाहतूक पोलीस, MSEDCL, MNGL इ.विभागामार्फत याकामी नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्याद्वारे प्रक्रियेवर देखरेख ठेवणेची व्यवस्था करावी.
• सध्या शहरामध्ये अधिकृत परवानगीशिवाय केबलचे जाळे विस्तारलेले आहे. त्याचे नियमन करणेसाठी सर्व संस्थांचे लोकप्रतिनिधी व संबंधित असोसिएशन यांनी केलेल्या सूचनांवर विचार विनिमय होऊन तसेच पॉलीसीमधील तरतुदीनुसार अंतिम मानक कार्यपद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) SOP तयार करण्यात यावी.
• पालखी मार्गाबाबत संबंधित केबल चालकांसोबत झालेल्या चर्चेनुसार सध्या पुणे शहरात असलेल्या विविध ओव्हरहेड केबल्स प्राधान्याने काढण्यात याव्यात.

बैठकीसाठी  मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (विद्युत), राजेश बनकर, मुख्य अभियंता (पथ) तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: