Pune Mayor on MNGL | ज्या भागांत अद्याप MNGL गॅस पाइपलाइन सेवा उपलब्ध नाही तिथे  प्राधान्याने सेवा देण्याच्या महापौरांच्या  सूचना

HomeBreaking News

Pune Mayor on MNGL | ज्या भागांत अद्याप MNGL गॅस पाइपलाइन सेवा उपलब्ध नाही तिथे  प्राधान्याने सेवा देण्याच्या महापौरांच्या  सूचना

Ganesh Kumar Mule Apr 08, 2026 1:11 PM

NCP- SCP | महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक | तीन तोंडाच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा निषेध
Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 
PMC Retired Employees | फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 39 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त

Pune Mayor on MNGL | ज्या भागांत अद्याप MNGL गॅस पाइपलाइन सेवा उपलब्ध नाही तिथे  प्राधान्याने सेवा देण्याच्या महापौरांच्या  सूचना

| पुणे महानगरपालिकेत MNGL संदर्भात आढावा बैठक संपन्न

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) संदर्भात आज आढावा बैठक महापौर (मंजुषा  दीपक नागपूरे) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत पुणे शहरातील सध्या सुरू असलेल्या गॅस पाइपलाइन कामांचा तसेच प्रस्तावित प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. MNGL कडून शहरातील विविध भागांतील कामांची सद्यस्थिती, गॅस पाइपलाइन कव्हरेज, तसेच विस्तार आराखड्याची माहिती सादर करण्यात आली. (Pune News)

बैठकीदरम्यान महापौरांनी शहरातील ज्या भागांमध्ये अद्याप गॅस पाइपलाइन सेवा उपलब्ध नाही, त्या भागांना प्राधान्याने सेवा देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

महापौरांनी पुढे नमूद केले की, “पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंड व सुलभ गॅस पुरवठा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. यासाठी MNGL व महानगरपालिका यांच्यात समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल.”

या बैठकीस MNGL चे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: