Pune Congress on Pune Rain | सत्ताधारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पुणेकरांचे हाल  | मान्सूनपूर्व कामांबाबत सर्वपक्षीय बैठक प्रशासनासमवेत आयोजित करावी |  कॉंग्रेस पक्षाची मागणी

Homeadministrative

Pune Congress on Pune Rain | सत्ताधारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पुणेकरांचे हाल  | मान्सूनपूर्व कामांबाबत सर्वपक्षीय बैठक प्रशासनासमवेत आयोजित करावी |  कॉंग्रेस पक्षाची मागणी

Ganesh Kumar Mule Apr 06, 2026 1:25 PM

PMC SDD | दिव्यांग्याच्या खात्यात ११ कोटी रक्कम जमा | महापालिकेच्या विविध योजनांचा २९७९ लाभार्थ्यांना मिळाला लाभ!
PMC IWMS | महापालिकेच्या कामाच्या एस्टीमेटपासून ते कामाचे बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे पेपरलेस होणार | शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची माहिती
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात 

Pune Congress on Pune Rain | सत्ताधारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पुणेकरांचे हाल  | मान्सूनपूर्व कामांबाबत सर्वपक्षीय बैठक प्रशासनासमवेत आयोजित करावी |  कॉंग्रेस पक्षाची मागणी

 

Chandu Kadam Congress – (The Karbhari News Service) – पुण्याची ६० लाखाच्या आसपास लोकसंख्या असून प्रत्येक पावसाळ्यात पुणेकरांना मोठ्या हालअपेष्ठांना सामोरे जावे लागत असल्याचे मागील ७ ते ८ वर्षांपासून  बघत आहोत. पुणे शहरातील स्थापत्य कामे व पूरस्थितीचे नियंत्रण या बाबी एन.डी.आर.एफ कडे सोपविण्याची वेळ सत्ताधारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे आलेली आहे. असा आरोप कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला आहे. तसेच  महापौर यांनी आगामी काळात मान्सूनपूर्व करावयाच्या कामांबाबत सर्वपक्षीय बैठक प्रशासनासमवेत तातडीने आयोजित करावी. अशी मागणी देखील कदम यांनी केली आहे. (Pune PMC News)

कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार  इतिहास काळापासून पुणे हे मुळा/मुठा नदीच्या काठावर वसलेले शहर होते, परंतु गेल्या ७ ते ८ वर्षातील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे थोड्या पावसाने सुद्धा दुथडी भरून वाहणारे रस्ते पाहून सध्याचे पुणे शहर हे अनेक नद्यांच्या मध्यभागी वसले आहे का असा पुणेकरांना प्रश्न पडला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने पुणे शहराला तळ्याचे शहर (CITY OF LAKE) चे स्वरूप दिले व प्रशासनाची पर्यायाने, राजकीय नेतृत्वाची, अकार्यक्षमता ठळकपणे पुणेकरांच्या समोर आणली.

नुकत्याच झालेल्या जागतिक सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने शहराची केलेली रंगरंगोटी, रस्त्यांचे डांबरीकरण पहिल्याच पावसात वाहून गेल्याने देशातील उद्याचे सर्वात प्रगत महानगर म्हणून झेप घेणाऱ्या पुणे शहराची व पुणेकरांना याचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपची सर्वत्र नाचक्की झालेली आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेकडे प्रशासनाने व सत्ताधारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने, रस्त्यांना आलेल्या नदी/नाल्याचे स्वरूप व त्यामुळे शहरात झालेली प्रचंड वाहतूक कोंडी हि पुणेकरांशी सत्ताधाऱ्यांनी केलेली प्रतारणाच म्हणावी लागेल. २१ व्या शतकात जागतिक पातळीवर लौकिकास आलेल्या पुणे शहराला वेगाने बकाल करण्याचे काम, विकासात्मक दूरदृष्टीचा अभाव, असलेल्या भाजपच्या काळात होत आहे. असे कदम यांनी म्हटले आहे.

कमी दराने येणाऱ्या निविदांचा कल पाहता शहरात गुणवत्तापूर्ण कामे होऊ शकत नाही हि वस्तुस्थिती दुर्लक्षित करून ठेकेदारांच्या फायद्यासाठी सत्ताधारी त्यास मान्यता देतात हे शहराचे दुर्दैव म्हंटले पाहिजे.

EIL या गुणवत्ता नियंत्रण संस्थेला पुणे मनपा कामाची गुणवत्ता राखली जाते अथवा नाही व तांत्रिकदृष्ट्या काम योग्य रीतीने करण्यात आले किंवा कसे यासाठी दरवर्षी करोडोंची सल्ला फी देते. वरील परिस्थिती लक्षात घेता EIL या संस्थेस पुणे मनपा प्रशासनाने जाब विचारावा अशी कॉंग्रेस पक्षाची नूतन महापौर यांच्याकडे मागणी आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: