PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार  | ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार

PMC Safai Kamgar

Homeadministrative

PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार | ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार

Ganesh Kumar Mule Oct 08, 2026 7:58 PM

PMC Property Tax Department | पुणे महापालिका मिळकतकर विभागाचा कारवाईचा धडाका | एकाच दिवशी 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 मिळकती केल्या सील
PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत
Time-bound promotion | आर्थिक भारामुळे कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीचा विषय प्रलंबित  | पदोन्नतीचा लाभ तात्काळ देण्याची कर्मचारी संघटनांची मागणी 

PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार

| ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार

 

Pune PMC News – The Karbhari News Service –  पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकाम उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी घनकचरा व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांच्या आदेशानुसार झालेल्या या बैठकीत झाडणकामाच्या हद्दींची फेरतपासणी, प्लास्टिकसह दंडात्मक कारवाईत वाढ, कॅन्टोनमेंट भागातील स्वच्छतेचे नियोजन तसेच वर्षानुवर्षे गैरहजर असलेल्या सफाई सेवकांवर कारवाई, असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अशी माहिती उपायुक्त संतोष वारुळे (Deputy Commissioner Santosh Warule)  यांनी दिली.  (PMC Solid Waste Management Department)

 

या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजीत नायर (Prajit Nair IAS) , घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, परिमंडळ क्र. १ ते ५ चे उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे महापालिका सहाय्यक आयुक्त तसेच सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

परफॉर्मन्स बेस्ड झाडणकामामुळे सुधारणा दिसत असल्याचा दावा

सध्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने कालावधीसाठी ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकाम उपक्रम सुरू असून, बैठकीत या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. या उपक्रमामुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेसाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध झाले असून, सार्वजनिक स्वच्छता व झाडणकामामध्ये नक्कीच सुधारणा दिसून येत असल्याचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांनी बैठकीत सांगितले.

७०० मीटरची एक हद्द; सोसायट्यांतील खाजगी रस्त्यांचाही समावेश

झाडणकामासाठी ७०० मीटर लांबीची एक हद्द निश्चित करून त्यानुसार आवश्यक सफाई सेवक संख्या ठरवण्यात आली आहे. मात्र हद्दी निश्चित करताना अनेक ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्यांमधील अंतर्गत खाजगी रस्तेही धरले गेल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे मॅपिंग करण्यात आलेल्या रस्त्यांची पुन्हा पडताळणी करून, ज्या ठिकाणी अशाप्रकारे सोसायट्यांमधील अंतर्गत खाजगी रस्ते आले असतील, त्या हद्दी कमी करून सुधारित हद्दीची माहिती पुढील ५ दिवसांत मुख्य खात्याकडे सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी बैठकीत दिले.

प्लास्टिकसह दंडात्मक कारवाई वाढवण्याचे आदेश

प्लास्टिक व इतर सर्व प्रकारच्या दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढवून शहरात सर्वत्र प्रभावी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी दिले.

कॅन्टोनमेंट भागातील स्वच्छतेवर लक्ष

कॅन्टोनमेंट बोर्ड भागातील सार्वजनिक स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने आणि कॅन्टोनमेंटमार्फत आवश्यक सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज केले जात नसल्याने, त्या भागात स्वच्छतेचे योग्य ते नियोजन करण्याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी सूचना दिल्या.

५ वर्षांहून जास्त गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची कारवाई

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनेक कायम सफाई सेवक वर्षानुवर्षे गैरहजर असल्याचे आढळून येत आहे. याबाबत ५ वर्षांहून जास्त कालावधीसाठी सतत गैरहजर असलेल्या सफाई सेवकांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबतचे प्रस्ताव सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

कायम सफाई सेवकांना इतर स्वच्छता कामे

तसेच ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामामुळे ज्या ठिकाणी कायम सफाई सेवकांमार्फत झाडणकाम केले जात होते, त्या सफाई सेवकांना सार्वजनिक स्वच्छतेचे इतर कामकाज देऊन त्यांचे योग्य ते नियोजन करावे, असेही अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी आदेशित केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: