Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष

Homeadministrative

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष

Ganesh Kumar Mule Apr 03, 2026 8:36 PM

Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप
Funeral | अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ?
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात 

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या  मुख्य सभेत तसेच स्थायी समितीच्या बैठकीत सभासदांनी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठ्‌याबाबतच्या समस्या मांडलेल्या आहेत. तसेच, उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीपुरवठ्‌याची मागणी वाढल्यामुळे पाणीपुरवठ्‌यासंबंधी तक्रारींमध्येही वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण शहरामध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक तेवढी पाण्याची उपलब्धता तसेच आर्थिक तरतूद उपलब्ध आहे. तथापि, पुणे शहरामध्ये पाणीपुरवठ्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये अपुरा पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा, अनियमित वेळेचा पाणीपुरवठा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा अशा स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश आहे. (Pune PMC News)

तसेच,  उच्च न्यायालय, मुंबई येथील जनहित याचिका क्र. १२६ / २०२२ (वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर) संदर्भात  विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समस्या समितीच्या बैठकीत देखील पाणीपुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत.

समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी जुन्या हद्दीतील पाण्याचा अनावश्यक वापर कमी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी पाण्याच्या गळती शोधणे, त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे तसेच अतिरिक्त पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच, नियोजनबद्ध व तांत्रिकदृष्ट्या सक्षम पाणी वितरण व्यवस्था कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे शहरामध्ये सुरू असलेली समान पाणी वाटप योजना पूर्ण करून ती कार्यक्षमपणे अंमलात आणणे अत्यंत आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने,  महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे पाणीपुरवठा विभागातील वितरण, प्रकल्प व जलशुद्धीकरण केंद्रांमधील सुमारे १२५ अभियंत्यांसोबत बैठक घेऊन सदर प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

पूर्वी पुणे शहरामध्ये साधारण १० ते १२ ठिकाणांवरून अत्यंत मोठ्‌या क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात होता. या पद्धतीमुळे शेवटच्या (टेल एंड ) भागांमध्ये पाणी न पोहोचणे, सखल भागांमध्ये पाणीगळती होणे तसेच काही भागांमध्ये नागरिकांकडून पाण्याचा जादा वापर होणे यामुळे उंच भाग व टेल-एंड भागात पाणीपुरवठा होत नव्हता. तसेच, एका टाकीवरून मोठ्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणेही अवघड होत होते.

या समस्यांवर उपाय म्हणून समान पाणी वाटप योजना हाती घेण्यात आली असून, त्यानुसार शहराचे १४१ झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र टाकी तसेच त्या झोनपर्यंत स्वतंत्र जलवाहिनीमार्फत पाणी पोहोचवून स्थानिक पातळीवर वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सदर १४१ झोनपैकी सुमारे ४० झोन कार्यान्वित झाले असून, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सिंहगड रोड, दत्तवाडी, राजाराम पूल परिसर, परांजपे स्कीम, वडगाव खुर्द, कळस, धानोरी, मानस सरोवर परिसर आदी भागांमध्ये सुमारे ३५ टाक्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.

या भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या पूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत सध्याच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. विशेषतः दाबासंबंधी तक्रारी कमी झाल्या असून, पूर्वी पाणी न मिळणाऱ्या टेल-एंड भागांमध्येही पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच, टँकरची आवश्यकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. या भागातील पूर्वीची पाणिपूर्वथयाची परिस्थिति व समान पाणी पवाटप प्रकल्पीय कांनंतरची परिसतहतीत यांचा अहवाल तयार करून परिसिध्द करण्याबात मा महा पालिक आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत.

तथापि, काही ठिकाणी टाक्या कार्यान्वित झाल्यानंतरही त्या संबंधित झोनचे पूर्ण विलगीकरण (Isolation ) न झाल्यामुळे अपेक्षित सुधारणा दिसून येत नाही. यासाठी लगतच्या झोनमधील उर्वरित कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. आढाव्यात असे निदर्शनास आले की, काही किरकोळ स्वरूपाची कामे प्रलंबित आहेत, ज्यामुळे प्रकल्पाचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.

यासंदर्भात  महापालिका आयुक्त यांनी टाकीनिहाय प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन ती कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कालबधड कार्यक्रम तयार करून कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.

बैठकीदरम्यान संबंधित अभियंत्यांनी काही नागरिकांकडून पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध होत असल्याचे तसेच पथ विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर महापालिका आयुक्त यांनी प्रकल्पाच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच, अत्यल्प प्रलंबित कामांमुळे मोठ्या प्रमाणावर तयार झालेली पायाभूत सुविधा वापरात येत नसल्याने, पुढील काळात पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामांसाठी पथ विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार नसल्याबाबत कार्यालयीन परिपत्रक निर्गमित करण्याचे सांगितले. तसेच, सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: