Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

HomeBreaking News

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

Ganesh Kumar Mule Apr 03, 2026 6:23 PM

Parbhani Violence | संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा |  रिपब्लिकन पक्षाची मागणी
Maharashtra MLC | विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी संपन्न 
Maharashtra Cabinet Meeting | आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या 

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

 

Maharashtra Youth Congress – (The Karbhari news Service) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, युवकांमध्ये आक्रमक आणि अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रथमेश विकास आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (Pune News)

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शांभवी शुक्ला व नवज्योत संधू यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

प्रथमेश आबनावे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर विविध प्रश्नांवर आक्रमक आणि संघटित आंदोलन उभारली आहेत. भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेत त्यांनी नियोजन व सक्रिय सहभाग घेतला. MPSC Pattern Change 2025 विरोधातील उपोषण, अग्निवीर योजनेविरोधातील दिल्ली व पुण्यातील रेल रोको आंदोलन, खडकी (पुणे) येथील रेल रोको, प्रवाशांवरील अन्यायकारक भाडेवाढीविरोधातील लढा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केलेला संघर्ष, तसेच ट्रेड डीलविरोधातील पीएम कॉम्प्रमाईज आंदोलन—या सर्व आंदोलनांत त्यांनी अग्रभागी भूमिका निभावली आहे. दिल्ली, पुणे, नागपूर आणि मुंबई येथे झालेल्या असंख्य आंदोलनांतून त्यांनी युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवली आहे. विविध निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या डोअर-टू-डोअर मोहिमेद्वारे विक्रमी जनसंपर्क साधत संघटना मजबूत करण्याचे कामही त्यांनी सातत्याने केले आहे.

याशिवाय, यंग इन्स्पिरेटर नेटवर्क (YIN) या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत युवकांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सत्रे, संवाद उपक्रम आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवले आहेत. नव्या पिढीला सामाजिक व राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे हे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.

राजकीय कार्यासोबतच ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय आहेत.

ते महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ या ९९ वर्षांच्या ऐतिहासिक संस्थेत संचालक व खजिनदार म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. Urban Development आणि Sustainable City Development या विषयांवरील त्यांचा अभ्यासही लक्षवेधी आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना प्रथमेश आबनावे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय इन्चार्ज मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शांभवी शुक्ला व नवज्योत संधू तसेच प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

ते पुढे म्हणाले की, “धर्मनिरपेक्षतेचा विचार, महात्मा गांधींची शिकवण, सातत्य, संघर्ष आणि निष्ठा या मूल्यांवर उभं राहून काम करण्याचा माझा निर्धार आहे.

देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलेले तरुणांचे प्रश्न आणि त्यासाठीची लढाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मा. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मिळालेली संधी हीच माझी प्रेरणा आहे.”

आबनावे यांनी आपल्या यशामागे ज्येष्ठ नेते  मोहन जोशी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांचे मार्गदर्शन तसेच कुटुंबियांची साथ अधोरेखित केली. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांच्या ६८ व्या जयंतीच्या दिवशीच ही निवड झाल्याने हा क्षण अधिक भावनिक ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

“आजची जबाबदारी ही केवळ पद नसून युवकांच्या विश्वासाची आहे. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी अखंड प्रयत्न करेन,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: