Pune Municipal Corporation – PMC | मार्च  महिन्यात पुणे महापालिकेचे 61 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

Pune Municipal Corporation – PMC | मार्च  महिन्यात पुणे महापालिकेचे 61 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Mar 30, 2026 7:35 PM

PMC – PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला 
MLA Madhuri Misal | पुणे शहराच्या विकासाला गती द्या | आमदार माधुरी मिसाळ यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती
Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किम प्रारूप आराखड्यावर 191 हरकती

Pune Municipal Corporation – PMC | मार्च  महिन्यात पुणे महापालिकेचे 61 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – मार्च, 2026 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 61 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते दत्ता कोहिनकर, कार्यकारी अभियंता शोभा घोलप, मा.अध्यक्ष,पीएमसी सर्व्हन्ट्स को-ऑप. अर्बन बँक,  विठ्ठल जगदाळे हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे विठ्ठल जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दत्ता कोहिनकर यांनी सेवानिवृत्त सेवकांना त्यांच्या ईच्छा पूर्ण करा, प्रत्येकाने रोज एक तास व्यायाम करा, जीवन सुंदर आहे त्याचा आनंद घ्या, आपला पैसा जपून वापरा, आपले आरोग्य सांभाळा असे नमूद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका जोशी व आयोजन  महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0