Asavari Jagdale PMC |  आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासन अधिकारी (वर्ग २)  पदावर नियुक्ती!

Homeadministrative

Asavari Jagdale PMC |  आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासन अधिकारी (वर्ग २)  पदावर नियुक्ती!

Ganesh Kumar Mule Mar 18, 2026 9:30 PM

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश
Insurance Broker | PMC medical insurance | अंशदायी वैद्यकीय योजनेतील सदस्यांना वैदकीय विमा देण्यासाठी ब्रोकरची नियुक्ती | स्थायी समितीत रात्रीच्या वेळी आला प्रस्ताव
IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

Asavari Jagdale PMC |  आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासन अधिकारी (वर्ग २)  पदावर नियुक्ती!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पहलगाम येथील  हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी संतोष जगदाळे यांना  पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. प्रशासन अधिकारी (वर्ग २) या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते आसावरी जगदाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, दुःखाच्या क्षणी दिलेले वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाळले असून वेळोवेळी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यांनी हा विषय पूर्णत्वास नेला. कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच शासन व प्रशासनाचे कर्तव्य आहे.

आसावरी जगदाळे यांनी बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स तसेच एमबीए शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे त्यांची पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय पदावर नियुक्ती करण्यात आली. अशा गुणवंत मुलीला संधी देताना अभिमान वाटत असल्याचेही महापौरांनी सांगितले.

राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका हे दोन्ही घटक संवेदनशीलपणे कार्य करत असून नागरिकांना वेळेत न्याय व मदत मिळावी यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांच्या कुटुंबाची काळजी घेणे हेच संवेदनशील प्रशासनाचे खरे स्वरूप आहे, असेही महापौरांनी नमूद केले.
या प्रसंगी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून आसावरी जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या तसेच कुटुंबीयांना धीर दिला.

याप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम,  सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर व जगदाळे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती दिली जात नाही. अशा कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाणार का? तसेच नियमाप्रमाणे शहीद होण्याची घटना घडल्यास वर्ग ३ पदावर नियुक्ती दिली जाते. मग असा न्याय इथून पुढे सर्वांनाच लावला जाणार का? किंवा या आधीच्या लोकांना लावला जाणार का, अशी चर्चा महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुजत्या स्वरात होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: