PMC Pune Census | १६ मे ते १४ जून  या कालावधीत महापालिका पुण्यात करणार जनगणना!

Homeadministrative

PMC Pune Census | १६ मे ते १४ जून  या कालावधीत महापालिका पुण्यात करणार जनगणना!

Ganesh Kumar Mule Mar 13, 2026 8:35 PM

Bank employees strike| महत्वाची कामे उरकून घ्या | बँक कर्मचाऱ्यांचा ‘5-डे वीक’च्या मागणीसाठी संप | तीन दिवस बँका राहणार बंद
Pune Festival | IAS Vikra Kumar | सौ.व श्री विक्रम कुमार यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न
Pune Heritage Walk | पुणे शहरात विविध ठिकाणांचे “हेरीटेज वॉक” सुरु केले जाणार  | १०० पासून ते ५०० पर्यंत असणार तिकीट 

PMC Pune Census | १६ मे ते १४ जून  या कालावधीत महापालिका पुण्यात करणार जनगणना!

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – भारत सरकार जनगणना संचालनालयाच्यावतीने भारताची जनगणना २०२७ चे पहिल्या फेरीचे (घराची यादी व घराची गणना) कामकाज  १६ मे  ते  १४ जून  या कालावधीत पुणे महानगरपालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत करण्यात येणार आहे. या कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल तथा जनगणना आयुक्त, दिल्ली या कार्यालयाकडील  एन राजीव (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) तसेच जनगणना कार्य संचालनालय मुंबई, महाराष्ट्र या कार्यालयाकडील वाय.एस. पाटील (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) व आर.एम.भोसले (जॉइंट डायरेक्टर) यांनी पुणे महानगरपालिकेस भेट दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

या प्रसंगी ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका व विजय लांडगे, शहर जणगणना अधिकारी तथा उप आयुक्त अधिकारी हे उपस्थित होते.

यावेळी एन राजीव (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) यांनी पुणे महानगरपालिकेच्या जणगणना २०२७ च्या पूर्व तयारीचा आढावा घेतला व उपस्थित सर्वांना जनगणना कामकाज निर्देशानुसार  १ मे ते १५ मे  असा नागरिकांसाठी स्वयंगणना (Self Enumeration) कालावधी असणार आहे व तदनंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत महानगरपालिका जनगणना पहिल्या फेरीचे कामकाज करण्याबाबत मार्गदर्शन करून महत्वाच्या सूचना दिल्या आणि पुणे महानगरपालिकेच्या जणगणना कामकाजाची तयारी व जनगणना मॅपिंग कामकाज हे समाधानकारक असल्याबाबत सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: