PMC Budget 2026-27 | स्थायी समिती कडून अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करण्याचे अधिकार सुपूर्त!  | २४ मार्च ला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता!

Homeadministrative

PMC Budget 2026-27 | स्थायी समिती कडून अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करण्याचे अधिकार सुपूर्त! | २४ मार्च ला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता!

Ganesh Kumar Mule Mar 12, 2026 11:43 AM

Naval Kishore Ram IAS | कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्त लावून त्यांची काळजी घेणारे आणि पर्यायाने शहराची काळजी घेणारे महापालिका आयुक्त नवल किशोर राम!
Rajiv Gandhi Zoo Katraj | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय जागतिक स्तरावरील प्राणीसंग्रहालयांप्रमाणे विकसित करा | महापालिका आयुक्त यांच्या सूचना
Naval Kishore Ram IAS | नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल होणार – पुणे महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांच्‍या अधिकाऱ्यांना सूचना

PMC Budget 2026-27 | स्थायी समिती कडून अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करण्याचे अधिकार सुपूर्त!

| २४ मार्च ला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता!

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Channel) – महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीला आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. साडे तेरा हजार कोटींचे बजेट सादर करण्यात आले आहे. दरम्यान आता अंतिम बजेट हे स्थायी समिती अध्यक्ष सादर करणार आहेत. हे बजेट सादर करण्याचे अधिकार समितीने अध्यक्षांना काल सुपूर्त केले. दोन दिवसांच्या चर्चेनंतर हे अधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे २४ मार्च ला बजेट सादर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनच्या वतीने आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. आता यात काही सुधारणा करत आणि काही योजना वाढवत अंतिम बजेट हे स्थायी समिती मुख्य सभेला सादर करेल. त्यानुसार स्थायी समिती आणि अध्यक्ष यांनी तयारी सुरू केली आहे. आयुक्तांनी बजेट सादर केल्यानंतर समिती अध्यक्ष आणि समिती सदस्यांनी दोन दिवस आयुक्तांनी सादर केलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ही चर्चा चालली.

या दोन दिवसात प्रत्येक विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच काही सूचना देखील सदस्यांनी केल्या. त्यानुसार आता अंतिम बजेट मध्ये अध्यक्ष अजून काही योजना सुचवतील आणि सुधारणां करून अंतिम बजेट सादर करतील.

दरम्यान दोन दिवसांच्या चर्चेनंतर समितीने अध्यक्षांना बजेट सादर करण्याचे अधिकार सुपूर्त केले आहेत. त्यानुसार अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे २४ मार्च ला बजेट सादर करतील, अशी शक्यता आहे. यावर मुख्य सभेत चर्चा होईल. कारण मुख्य सभेत हे अंतिम बजेट ३१ मार्च च्या अगोदर मंजूर होणे आवश्यक असते. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आलेली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: