Mahesh Awhad IAS | पीएमपी च्या सीएमडी पदी महेश आव्हाड यांची नियुक्ती | राज्य सरकार कडून आदेश जारी 

Homeadministrative

Mahesh Awhad IAS | पीएमपी च्या सीएमडी पदी महेश आव्हाड यांची नियुक्ती | राज्य सरकार कडून आदेश जारी 

Ganesh Kumar Mule Mar 11, 2026 9:39 PM

1900 transfer employees of PMPML will join permanent service..!! 
PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा | The Karbhari ने उचलून धरला होता विषय
PMP Pune Income | २० नोव्हेंबर रोजी ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

Mahesh Awhad IAS | पीएमपी च्या सीएमडी पदी महेश आव्हाड यांची नियुक्ती | राज्य सरकार कडून आदेश जारी

 

PMPML CMD – (The Karbhari News Service) – पुणे पीएमपीएमएल च्या सीएमडी पदी राज्य सरकार कडून पूर्ण वेळ अधिकारी देण्यात आला असून महेश आव्हाड यांची नियुक्ती सीएमडी पदावर करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून नुकतेच याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMP News)

सीएमडी पंकज देवरे हे प्रशिक्षण घेण्यास गेल्यानंतर पीएमपी ला पूर्ण वेळ अधिकारी नव्हता. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्याकडे सीएमडी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान आता सरकारने महेश आव्हाड यांची नियुक्ती सीएमडी पदावर नियुक्ती केली आहे. आव्हाड हे या पूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण चे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहत होते.

दरम्यान देवरे यांच्या कार्यकाळातील पीएमपी मधील पदोन्नती प्रकरण चांगलेच गाजले होते. देवरे यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. त्यामुळेच पुन्हा देवरे यांना पीएमपी मध्ये बोलावण्यात आले नाही. अशी चर्चा केली जात आहे.


आमच्या लढ्याला यश आले आहे. पंकज देवरे आता पीएमपी मध्ये येणार नाहीत. ज्या कर्मचाऱ्यांना बढती साठी दमदाटी करून पैसे जमा केले, त्यासाठी जे एजंट होते त्यांच्यावर कार्यवाही करून ज्या ज्या सेवकाने आपले आपल्या पत्नीचे मंगळसूत्रा सकट दागिने घाण टाकले बँकाची कर्ज घेतली त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत. त्यासाठी या सर्व कालावधीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे बँकेचे व्यवहार तपासायला पाहिजेत. काही लोकांनी फ्लॅट बुक केले.  गाड्या घेतल्या, पण सामान्य सेवक भरडला गेला, लाचलुचपत विभागाची चौकशी लावून या पाच सहा एजंट ना अटक करणे आवश्यक आहे. तर आणि तरच यांचे पैसे परत मिळतील. महाराष्ट्र शासनाने अथवा नवीन सीएमडीने याबाबत पुढाकार घ्यावा.

| उज्वल केसकर, माजी नगरसेवक.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: