PMC Budget | येत्या सोमवारी (९ मार्च) १० स्वीकृत नगरसेवक समजणार आणि | महापालिका आयुक्त स्थायी समितीला अंदाजपत्रक करणार सादर  

Homeadministrative

PMC Budget | येत्या सोमवारी (९ मार्च) १० स्वीकृत नगरसेवक समजणार आणि | महापालिका आयुक्त स्थायी समितीला अंदाजपत्रक करणार सादर  

Ganesh Kumar Mule Mar 04, 2026 8:51 PM

PMC Solid Waste Management Department | स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिकांचा सहभाग प्रबळ करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थेचा अधिकचा सहभाग अपेक्षित | महापालिका आयुक्त नवल किशोर राम 
Domestic Water Use | पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी
Pune Smart City | पुणे स्मार्ट सिटी बद्दल श्वेतपत्रिका काढा | मोहन जोशी

PMC Budget | येत्या सोमवारी (९ मार्च) १० स्वीकृत नगरसेवक समजणार आणि | महापालिका आयुक्त स्थायी समितीला अंदाजपत्रक करणार सादर

 

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे ९ मार्च अर्थात येत्या सोमवारी आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार आहेत. प्रशासक काळ संपल्या नंतरचे आयुक्तांचे हे पहिले बजेट असणार आहे. मागील वर्षी साडे बारा हजार कोटींचे बजेट होते. ते आता किती असणार आणि त्यात काय योजना असणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान याच दिवशी स्वीकृत नगरसेवक बाबत पक्षनेते आपली शिफारस करणार आहेत. त्यामुळे याच दिवशी १० स्वीकृत नगरसेवक कोण असणार, हे समजणार आहे. (Pune PMC News)

गेले चार वर्ष पुणे महापालिकेचे बजेट हे महापलिका आयुक्त तथा प्रशासक सादर करायचे आणि तेच त्याला मंजुरी देखील द्यायचे. मात्र आता नगरसेवक, स्थायी समिती आणि सभागृह देखील अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आता चार वर्षानंतर महापालिका आयुक्त हे स्थायी समिती अध्यक्ष यांना बजेट सादर करणार आहेत. महापालिका अधिनियम १५ नुसार महसुली, भांडवली खर्चाचे आणि उत्पन्नाचे अंदाजपत्रक हे १५ जानेवारी पूर्वी आयुक्तांनी स्थायी समितीला सादर करणे आवश्यक होते. मात्र महापालिका निवडणूक असल्याने मुदतीत हे बजेट सादर करता आले नाही. त्यामुळे आता ९ मार्च ला बजेट सादर केले जाईल. असे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. सोमवारी दुपारी हे बजेट सादर केले जाईल. बजेट च्या आधी स्वीकृत नगरसेवकांसाठी नामनिर्देशन दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी दुपारी २ नंतर बजेट सादर होईल, असे म्हटले जात आहे. (PMC Nominated Corporators)

बजेट मधून शहर वासियांना चांगल्या पायाभूत सुविधा दिल्या जाव्यात, समाविष्ट गावांना पाण्याची सुविधा दिली जावी. अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आयुक्तांना बजेट सादर करताना चांगली कसरत करावी लागणार आहे. या माध्यमातून सर्व घटकांना न्याय द्यावा लागणार आहे. जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

| स्वीकृत नगरसेवका बाबत उत्सुकता

दरम्यान महापालिका आयुक्त यांनी गटनेत्यांना पत्र पाठवत स्वीकृत नगरसेवकांसाठी नावे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ९ मार्च ला पक्षनेते आपले उमेदवार जाहीर करतील आणि त्यांचे नामनिर्देशन दाखल होईल. याच दिवशी १० स्वीकृत नगरसेवक कोण असतील, हे समजणार आहे. मात्र महापालिका आयुक्त या सर्व नामनिर्देशन ची छाननी करतील. त्यानंतर आपली शिफारस मुख्य सभेला करतील. त्यानंतर मुख्य सभा स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर करेल. दरम्यान यात कुणाकुणाला संधी मिळणार आहे, याबाबत मात्र कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

पक्षीय बलाबल

भाजप – ७

राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) – २

कॉंग्रेस – १

एकूण – १० नामनिर्देशित सदस्य

 


 

पुणेकर मिळकतकर धारकांना चांगल्या  पायाभूत सुविधा या बजेट च्या माध्यमातून मिळणे अपेक्षित आहे. शहरात आणि समाविष्ट गावात समान पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी बजेट मध्ये काय तरतूद असणार, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच चांगले रस्ते, मिसिंग लिंक याबाबत चांगल्या तरतुदी असाव्यात. शहरात कचरा आणि स्वच्छतेच्या तक्रारी आहेत, त्या अनुषंगाने योजना आणि तरतुदी असायला हव्यात. समाविष्ट गावात रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि त्यांना पिण्याची पाण्याची सुविधा देणे महत्वाचे आहे. त्यासाठी या बजेटमध्ये तरतुद असायला हवी आहे.

| निलेश निकम, विरोधी पक्षनेता. 

——–

बजेटमधून समाविष्ट गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना आणि त्यावरील तरतूद महत्वाची असणार आहे. या गावात किमान Raw Water तरी मुबलक प्रमाणात द्यायला हवे आहे. तसेच रस्त्यासाठी भरीव तरतूद असणे अपेक्षित आहे. लोकमत ते सावित्री गार्डन रस्ता, शिवणे परिसरातील शिंदे पूल ते कॅनॉल रोड, असे सगळे रस्ते आणि पर्यायी रस्त्यांसाठी बजेटमध्ये तरतूद असणे आवश्यक आहे. समाविष्ट गावात रस्ते, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत सुविधा यासाठी भरीव तरतूद अपेक्षित आहे. समाविष्ट गावात शाळांत मुलांची संख्या चांगली आहे पण तिथे मनुष्यबळ कमी आहे. याबाबत बजेटमध्ये लक्ष द्यायला हवे आहे. गावामध्ये कचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. यावर बजेटमध्ये भर दिलेला असावा.

| काका चव्हाण, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.)

——

गेली चार वर्ष प्रशासक बजेट सादर करत होते आणि तेच त्या बजेटला मान्यता देत होते. आता आम्ही आलो आहोत. आम्हाला जाणून घ्यायचे आहे कि, समान पाणीपुरवठा योजना का पूर्ण झाली नाही? त्यासाठी आतापर्यंत किती तरतूद केली गेली? महत्वाचे प्रकल्प जसे कि नदी सुधारणा प्रकल्प बाबत आयुक्तांनी आजपर्यत किती काम केले आणि किती तरतूद केली. समाविष्ट गावे आणि मध्यवर्ती शहरातून आपण लोकांकडून मिळकत कर पाणीपट्टी घेतो, मात्र त्यांना मुबलक पाणी देत नाही. याबाबत बजेटमध्ये काय असणार, हे महत्वाचे असणार आहे.

| चंदूशेठ कदम, गटनेते, कॉंग्रेस.

——–

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: