PMC Labour Welfare Department  | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना २ लाख आणि ५ लाख चे अर्थसहाय्य! | अमल करण्याबाबत प्रशासनाचे परिपत्रक जारी!

Homeadministrative

 PMC Labour Welfare Department  | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना २ लाख आणि ५ लाख चे अर्थसहाय्य! | अमल करण्याबाबत प्रशासनाचे परिपत्रक जारी!

Ganesh Kumar Mule Mar 03, 2026 2:05 PM

PMC Deputy Commissioner | कर आकारणी आणि कर संकलन विभाग आता रवी पवार यांच्याकडे, अरविंद माळी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन तर आशा राऊत यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग 
Pune Potholes | सायकल मार्गांचे जाळे उभारा; मात्र ती सायकल पुणेकरांनी खड्ड्यातून चालवायची का? | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिका आयुक्तांना सवाल
Pune PMC News – कात्रज – कोंढवा, शिवणे – खराडी रस्त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे महत्वाचे निर्देश 

 PMC Labour Welfare Department  | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना २ लाख आणि ५ लाख चे अर्थसहाय्य! | अमल करण्याबाबत प्रशासनाचे परिपत्रक जारी!

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कामावर असताना कुठल्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच कामगार कल्याण निधी मार्फत २ लाख दिले जाणार आहेत. यावर आता अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. त्याबाबत [प्रशासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार २ लाखाचे अर्थसहाय्य  ०१/०४/२०२६ रोजी किंवा त्यानंतर मृत झालेल्या महापालिका अधिकारी/कर्मचायांच्या वारसास अनुज्ञेय राहील. तसेच ५ लाख अर्थसहाय्य ०१/१२/२०२५ रोजी किंवा त्यानंतर मृत झालेल्या महापालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुज्ञेय राहील. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (PMC Labour Welfare Department)

पुणे महापालिकेत कामावर असताना दरवर्षी १०० ते १२५ कर्मचारी आणि अधिकारी यांचा विविध कारणाने मृत्यू होतो. मात्र त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य करण्या बाबत कुठला धोरणात्मक निर्णय नव्हता. मनपा निधीतून आणि कामगार कल्याण निधीतून ७५  हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र या अर्थसहाय्यात वाढ करणे गरजेचे आहे हे कामगार कल्याण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे विभागाकडून २ लाख आणि ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत स्थायी समिती च्या माध्यमातून मुख्य सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आल्यानंतर आता यावर अमल करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मनपा सेवेत कार्यरत असताना निधन पावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या वारसास कामगार कल्याण निधीमधून २२,५०० व मनपा निधीतून ५२,५०० असे एकूण ७५,०००  अर्थसहाय्य सद्यस्थितीमध्ये देण्यात येत होते. या योजनेमध्ये बदल करून ०१/०४/२०२६ पासून सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या पुणे मनपा अधिकारी, कर्मचाऱ्याचा पात्र वारसास कामगार कल्याण निधीमधून ३०,०००  व महापालिका निधीतून १,७०,००० असे एकूण २,००,०००  एकवट अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

याशिवाय कर्तव्यावर ( On Duty) असताना मनपा अधिकारी, कर्मचा-याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या पात्र वारसास ५,००,००० अर्थसहाय्य  ०१/१२/२०२५ पासून दिले जाणार आहे.

यासाठी वारसाने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.  पती/पत्नी शिवाय अन्य वारसास अनुदान / अर्थसहाय्य देय असल्यास इतर सर्व पात्र वारसांचे महा- ई-सेवा केंद्रातील संमतीपत्र दाखल करणे बंधनकारक राहील. पती किंवा पत्नी हयात असल्यास संमतीपत्राची आवश्यकता नाही. अर्जासोबत मूळ मृत्यु दाखला, महा-ई-सेवा केंद्रातील संमतीपत्र (आवश्यकतेनुसार) आणि शिधापत्रिका, वेतनचिठ्ठी, बचत खाते पासबुक पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत इ. च्या छायांकित प्रती खात्यामार्फत साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे. पात्र वारसाशिवाय अन्य व्यक्तीस वारस अनुदान व अर्थसहाय्य देण्याची संबंधित खात्याने शिफारस करु नये. अर्थसहाय्य मिळणेकामी कर्मचाऱ्याच्या मृत्यू दिनांकापासून १ वर्षाच्या आत अर्ज करणे अनिवार्य राहील. संबंधित पात्र वारसास या योजनेची माहिती तातडीने कळविण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील. फॉर्म व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून खातेप्रमुखाच्या शिफारशीसह कामगार कल्याण विभागाकडे सादर करावे. असे परिपत्रकात म्हटले आहे.


पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कामावर असताना कुठल्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच कामगार कल्याण निधी मार्फत २ लाख दिले जाणार आहेत.  यावर अमलबजावणी करण्यासाठी कार्यालय परिपत्रक प्रसूत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे खात्यांच्या शिफारशी सह सदर केल्यास त्याचा लाभ मिळणार आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबालातील  नातेवाईकांसाठी ही योजना लाभदायक आहे. त्याचा लाभ घ्यावा.

| नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे मनपा. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: