PMC Biometric Attendance  | नोंदणी ७९८२ कर्मचाऱ्यांची; प्रत्यक्ष हजेरी मात्र ३ ते साडे तीन हजार कर्मचाऱ्यांची | बायोमेट्रिक हजेरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

Homeadministrative

PMC Biometric Attendance  | नोंदणी ७९८२ कर्मचाऱ्यांची; प्रत्यक्ष हजेरी मात्र ३ ते साडे तीन हजार कर्मचाऱ्यांची | बायोमेट्रिक हजेरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

Ganesh Kumar Mule Feb 28, 2026 2:29 PM

Non teaching staff | Agitation | मनपा शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Chandni Chowk | चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात
Annasaheb Waghire College | विद्यार्थ्यांनो झोप उडविणारी स्वप्ने बाळगा |  यशवंत शितोळे

PMC Biometric Attendance  | नोंदणी ७९८२ कर्मचाऱ्यांची; प्रत्यक्ष हजेरी मात्र ३ ते साडे तीन हजार कर्मचाऱ्यांची!

| बायोमेट्रिक हजेरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

 

Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनातील पारदर्शकता, शिस्त व कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीद्वारेच दैनंदिन हजेरी नोंदविणे आवश्यक आहे. असे आदेश महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. मात्र याकडे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी म्हटले आहे. तसेच १ मार्च पासून बायोमेट्रिक हजेरी पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आली आहे. (PMC Employees)

पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये Aadhaar Based Facial Biometric Attendance Machine बसविण्यात आलेली आहे. संबंधित प्रणालीवर सुमारे ७९८२ कर्मचाऱ्यांनी नोंदणी (Registration) केलेली आहे. तथापि, प्रत्यक्ष उपस्थिती नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ३००० ते ३५०० इतकी असून, काही कर्मचारी हजेरी लावण्यात दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. असे अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे.

बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर नोंदणी केलेल्या सर्व पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १ मार्च पासून नियमितपणे बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावणे बंधनकारक राहील.  सर्व खातेप्रमुख, उपआयुक्त तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात व अंमलबजावणी सुनिश्चित करावी. असे आदेश अतिरिक्त आयुक्त  पृथ्वीराज बी पी यांनी जारी केले आहेत.

| खातेप्रमुख यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियमितपणे देखरेख ठेवावी

पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये एकूण ६० बायोमेट्रिक मशीन्स बसविण्यात आलेल्या आहेत.  बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीच्या कार्यवाहीकरिता संबंधित कंत्राटदारामार्फत सर्व खातेप्रमुख (HoD) यांचे लॉगिन क्रेडेंशियल्स (Sign-in Details) तयार करण्यात आलेले आहेत. उपस्थिती अहवाल पाहणे व नियंत्रण ठेवणे यासाठी आवश्यक लॉगिन माहिती संबंधित विभागांच्या अधिकृत ई-मेल संकेतस्थळावर पाठविण्यात आलेली आहे.  लॉगिनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष वेळेतील (Real-Time ) उपस्थिती तसेच आवश्यकतेनुसार मासिक उपस्थिती अहवाल डाउनलोड करता येईल. सदर बाबीची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी व प्राप्त लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियमितपणे देखरेख ठेवावी. असे अतिरिक्त आयुक्त यांनी आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: